आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले, ताप्ती पब्लिक स्कूलवर दगडफेक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शहरातीलहॉटेल यशोदासमोर भरधाव ट्रकने चिरडल्याने ताप्ती स्कूलमधील नऊवर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी १.४० वाजेच्या सुमारास घडली. वरणगाव रोडवरील छायादेवी राकानगरातील विद्यार्थी उदय किशोर रिल (वय ९) हा ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दुसरीत शिकत होता.

दुपारी १.३० वाजता शाळेतून तो पायी घराकडे जात असताना हॉटेल यशोदाजवळील राष्ट्रीय महामार्ग आेलांडत असताना भरधाव ट्रकने (सी. जी. ०७ सी - ५५६२) त्याला जबर धडक दिली. त्याचा जागीच मृत्यू झाला. शाळा तीन वाजता सुटणार असताना दीड वाजता विद्यार्थी बाहेर आलाच कसा? याचा जाब विचारण्यासाठी शाळेकडे पालक नातेवाईकांनी धाव घेतली.

शाळा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करा
नियोजितवेळेपूर्वीच विद्यार्थी शाळेच्या प्रवेशद्वारातून बाहेर आला कसा? त्यास जबाबदार असलेल्या मुख्याध्यापिकेसह कर्मचारी शाळा व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी मृत विद्यार्थ्याचे काका रंजित रिल यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार अर्जाद्वारे केली आहे.

शाळेच्याआवारात चाेख बंदोबस्त तैनात
पालकांच्यासंतप्त भावना लक्षात घेऊन पोिलसांनी शाळेच्या आवारात दुपारी दीड वाजेपासून चाेख बंदोबस्त तैनात केला आहे. शाळेच्या प्रवेशद्वारासह मुख्याध्यापकांच्या दालनाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील लोखंडी गेट बंद केलेे आहे. गॅदरिंगचे दोन्ही दिवसांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

सीसीटीव्हीचे फुटेज तपासणार
-शाळेतलावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेल तपासले जातील. विद्यार्थी प्रवेशद्वाराबाहेर जाण्यात कोणाची चूक आहे, याचा शोध घेतला जाईल. दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करू - मोहनफालक, अध्यक्ष,ताप्ती एज्युकेशन सोसायटी