आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाॅइलचाेरीप्रकरणी ट्रकचालकाला काेठडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - एमअायडीसीतीलडीपीतून अाॅइलचाेरी केल्याप्रकरणी पाेलिसांनी मंगळवारी ट्रकचालकाला अटक केली. त्याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी. डी. गोरे यांच्या न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पाेलिस काेठडी सुनावली. 
 
सुदर्शन इलाइट इंडस्ट्रीजसमोर १८ फेब्रुवारी राेजी रात्री २.३० वाजता महावितरण कंपनीच्या ट्रान्सफाॅर्मरजवळ ट्रक लावून अाॅइलची चोरी सुरू होती. हा प्रकार कंपनीच्या कामगारांच्या लक्षात अाल्याने त्यांनी पाेलिसांना फाेन करून माहिती दिली. त्यानंतर पाेलिसांनी घटनास्थळावर येऊन ट्रकचा क्लिनर जगदीशप्रसाद याला अटक केली हाेती. ताे सध्या पाेलिस काेठडीत अाहे.
 
महावितरण कंपनीचे अधिकारी प्रमोद रामदास तायडे यांच्या तक्रारीवरून एमअायडीसी पोलिस ठाण्यात ट्रकचालक, क्लिनर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.याप्रकरणी एमअायडीसी पाेलिसांनी ट्रकचालक हिरालाल प्रकाशचंद मेघवाल (वय ३२, रा. माेडक, जि. काेटा, राजस्थान) याला मंगळवारी दूरदर्शन टॉवरजवळून अटक केली. दुसरा संशयित जगदीशप्रसाद यालाही बुधवारी न्यायालयात हजर करण्याचे अादेश दिले अाहेत
बातम्या आणखी आहेत...