आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमअायडीसीत ट्रक अचानक पेटला; चालक भाजला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- एमअायडीसीतील‘व्ही’ सेक्टरमध्ये वखार महामंडळाच्या गाेडाऊनसमाेर असलेल्या मुकेश अॅग्राे इंडस्ट्रीजमध्ये उडदाची चुरी भरण्यासाठी ट्रक उभा हाेता. साेमवारी दुपारी ४.३२ वाजेच्या सुमारास या ट्रकच्या केबिनमध्ये अचानक अाग लागली काही सेकंदातच अागीने राैद्र रूप धारण केले. महापालिकेच्या दाेन बंबांनी अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर अाग अाटाेक्यात अाणली. या घटनेत चालक गंभीररीत्या भाजला अाहे.
एमअायडीसीत मुकेश श्रीकृष्ण वाणी यांच्या मालकीच्या मुकेश अॅग्राे इंडस्ट्रीजमध्ये साेमवारी दुपारी वाजता उडदाची चुरी भरण्यासाठी गाेपाल ट्रान्सपाेर्ट कंपनीतून ट्रक (क्र.एमपी-०९-एचजी-३९१६) मागवण्यात अाला हाेता. कंपनीच्या अावारात ट्रक लावलेला हाेता. उडदाची चुरी भरून ट्रक इंदूरला रवाना हाेणार हाेता. तसेच ट्रकच्या केबिनमध्ये चालक भिलू इदलिया किरार (वय २८, रा.उमराली, जि.अलियादपूर, मध्य प्रदेश) बसलेला हाेता. दुपारी वाजून ३२ मिनिटे सेकंदांनी ट्रकच्या केबिनमध्ये अचानक अाग लागली. काही सेकंदातच अागीने राैद्र रूप धारण केले. त्यामुळे चालक भिलू याला उतरण्यासाठीही वेळ मिळाल्याने ताे हाेरपळला. ताे जवळपास ५० टक्के भाजला अाहे. घटना घडण्याच्या तीन मिनिटांपूर्वी क्लिनर गजराजसिंग भारतसिंग चाैहान (वय २१, रा.खंडाला, िज.अलियादपूर) हा खाली उतरून ट्रकच्या मागच्या बाजूला अाला हाेता. अचानक अाग लागल्याने ट्रकमध्ये गाेण्या भरणारे तीन हमाल पटापट उड्या मारून बाजूला झाले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेत ट्रकचा डिझेल टँक फुटल्याने डिझेल कंपनीच्या गेटपर्यंत गेले. त्यामुळे आग कंपनीच्या गेटपर्यंत पसरली हाेती.

२०५गोण्या सुरक्षित
ट्रकजळत असताना कंपनीतील मजुरांनी तत्काळ धाव घेत मुकेश इंडस्ट्रीज छाजेड अॅग्रो इंडस्ट्रीजमधून चार फायर एक्स्टिंग्युशर आणून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे ट्रकमध्ये भरण्यासाठी बाहेर ठेवण्यात आलेल्या २०५ उडीद चुरीच्या गोण्या सुरक्षित राहिल्या. महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे दाेन बंब अर्ध्या तासात घटनास्थळावर पाेहाेचले. त्यांनी अर्धा तास प्रयत्न करून अाग विझवली.

अागनेमकी लागली कशी?
ट्रकलाअचानक लागली. मात्र, अाग लागण्याचे कारण स्पष्ट झाले नाही. तथापि, ट्रकच्या केबिनमध्ये चालक स्वयंपाक करत असल्याचा संशय पाेलिसांना अाहे. कारण शाॅर्ट सर्किट किंवा इतर कारणांमुळे अाग अचानक राैद्र रूप धारण करत नाही.

आगीच्या दाहकतेत ‘तो’ अर्धा तास!
ट्रकचालकभिलू किरार हा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी शरीराला आग लागलेली असतानाही कंपनीच्या बाहेर रस्त्यापर्यंत पळत अाला. या वेळी त्याच्या अाजूबाजूला लाेक उभे हाेते. तो मदतीसाठी याचना करत होता. मात्र, अर्धा तास कोणीही त्याच्या मदतीला धावून आले नाही. त्यानंतर रुग्णवाहिकेलाही पाचारण करण्यात आले; परंतु घटनास्थळ लांब असल्याने रुग्णवाहिका पोहाेचू शकली नाही. पोलिसांची गाडी येताना दिसताच दुसरा ट्रकचालक गजराजसिंग चौहान याने त्याला मदत केली. त्याला सिव्हिलमध्ये दाखल केले असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.