आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाराेळ्याजवळ ट्रक-व्हॅनची धडक; 4 ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारोळा - पाराेळ्याजवळ वेगाने जाणाऱ्या १० चाकी ट्रकने पिकअप व्हॅनला साेमवारी जोरदार धडक दिली. त्यात धुळ्यातील एकासह चार जण जागीच ठार झाले. भिवंडी येथून अब्दुल खलील मुजावर (रा. अमरावती) हा पिकअप व्हॅन (एमएचटीसी ५२६) रांची येथे घेऊन जात होता. यात मालेगाव येथून लग्नकार्य आटोपून पिंप्राळा (जळगाव) येथे येण्यासाठी सय्यद हारून सय्यद अकबर (वय ५७) बसले होते. सोबत त्यांच्या मुलीच्या सासू अरमानबी सलीम मुजावर (वय ५५) त्यांची नात मिसबाह जावेद सय्यद (वय ४) होती. त्यानंतर धुळे येथील प्लास्टिक मटेरिअलचे व्यावसायिक मुक्तारखान रहेमानखान पठाण (वय ६३) हे जळगाव येथे व्यावसायिक कामानिमित्त जात होते. ते धुळे येथून या व्हॅनमध्ये बसले होते. व्हॅन पारोळ्यापासून १२ किलाेमीटरअंतरावरील हिरापूर फाट्याजवळ ट्रकने या व्हॅनला जोरदार धडक दिली. व्हॅनमधील प्रवासी सय्यद हारून सय्यद अकबर (पिंप्राळा, जळगाव), अरमानबी सलीम मुजावर (पिंपळकोठा), मुक्तारखान रहेमान खान पठाण (धुळे) यांच्यासह व्हॅनचालक अब्दुल खलील अब्दुल कबीर (अमरावती) यांचा मृत्यू झाला. चारवर्षीय बालिका मिसबा बचावली.
बातम्या आणखी आहेत...