आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पिंप्राळ्यात थेट घरात घुसला ट्रक, सुमारे लाखांचे नुकसान; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- कट लागल्यामुळे रिक्षाचालक पाठलाग करत असताना ट्रकचालकाचा ताबा सुटला. त्यामुळे ट्रक थेट घरात घुसल्याने सुमारे दाेन लाखांचे नुकसान झाल्याची घटना रविवारी रात्री वाजता पिंप्राळ्यात घडली.
अंजिठा चौफुलीवर आंबे भरलेल्या ट्रक (क्र.एचआर-५५-टी-२२५०)चा रिक्षाला कट लागला. त्यामुळे संतापलेल्या रिक्षाचालकाने ट्रकचा पाठलाग सुरू केला. हे पाहून घाबरलेल्या ट्रकचालकाने ट्रक महामार्गावरील पिंप्राळ्यातील बुधवारच्या बाजार रस्त्यावरून गावाकडे वळवला. त्यातच जिल्हा बँक शाखेजवळ ट्रकने मंडपाला धडक दिल्याने मंडपाचा कापड ट्रकच्या काचेवर पडला.
त्यामुळे ट्रकचालक अधिकच गोंधळला. त्यानंतर त्याचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक थेट लीलाधर तुकाराम ठाकूर यांच्या घरात घुसला. त्यामुळे घराची पत्रे पडून भिंत दरवाजे तुटले. यासह घराबाहेर लावलेली हीरो होंडा डबल एस, लुना, लोटगाडी आणि पाण्याची टाकी असे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
हि घटना घडल्यानंतर ट्रक चालक अर्शद खान घटनास्थळावरुन फरार झाला. दरम्यान, या ट्रकच्या मागे मालक अनिलकुमार यांचा दुसरा ट्रक (क्र.एचआर-५५-टी-२२७९) धावत होता. तो देखील त्या ट्रकच्या मागे पिंप्राळापर्यत गेला. त्या ट्रकला रस्त्याच ग्रामस्थानी आडविले. त्यानंतर ट्रकचालक हकिमुद्दीन खान (मेवाद, हरियाणा), रशीद खान यांना मारहाण केली. याप्रकरणी ट्रकचालक अर्शद खान विरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, नुकसान भरपाई देण्यास नकार...