आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांबापुरा दंगलप्रकरणी नगरसेवक महाजन न्यायालयीन कोठडीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - रिक्षाचा कट लागल्यावरून तांबापुरा परिसरात झालेल्या दंगलप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या खान्देश विकास आघाडीचे नगरसेवक सुनील महाजन यांच्या अंतरिम जामिनाची मुदत संपत आल्याने रविवारी ते पोलिसांना शरण गेले. त्यांना न्यायलयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
रिक्षाचा कट लागल्याच्या कारणावरून तांबापुरा भागात दोन गटात दंगल झाली होती. याप्रकरणात अन्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर नगरसेवक सुनील महाजन यांनी अंतरिम जामीन मिळवला होता त्याची मुदत सोमवारी संपणार होती. अटक करण्यापूर्वी रविवारी सकाळी 11.30 वाजता ते एमआयडीसी पोलिसांना शरण गेले. तपासी अधिकारी बी.ए. कदम यांनी अटक करून न्या. ज्यो.वि. पेखलेपुरकर यांच्यासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे सध्या महाजन यांची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. त्यांच्यातर्फे अँड. सुनील चौधरी यांनी काम पाहिले. त्यांच्यासोबत याच गुन्ह्यातील आरोपी शकील पटेल व समद पटेल यांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.