आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालिकांमधील साड्यांची महिलांमध्ये क्रेझ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - साडी म्हणजे महिलांचा वीक पॉइंट. कुठलाही सण अथवा उत्सव असला तर आपल्या नव-याकडून साडी पटकावण्याची संधी महिला सहसा सोडत नाहीत. अशीही साड्यांना मोठी मागणी असतेच. कपड्यांच्या बाजारात साड्यांची जास्तीत जास्त विक्री होते.
सध्या विविध मालिकांची छोट्या पडद्यावर चांगली चलती आहे. अशा परिस्थितीत त्या मालिकांमधील नायिकांच्या साड्यांवर जास्त चर्चा होताना दिसते. तशाच प्रकारच्या हुबेहूब साड्या बाजारात दाखल होताना दिसतात. अशाच साड्यांची महिलांकडून मागणी होत असते. म्हणूनच कुमकुम स्टाइल, पवित्र रिश्ता स्टाइल साड्या बाजारात आहेत. जास्त करून जर्दोसी किंवा एम्ब्रॉयडरी वर्क केलेल्या साड्यांना चांगली मागणी आहे. पार्टिवेअर असो वा लग्नसमारंभ या साड्या जास्त चालतात. आता नुकतीच कोलावरी साडीही बाजारात दाखल झाली आहे. याशिवाय सिल्क, कॉटन, मिक्स सिल्क, नवरंग असे विविध साड्यांचे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. शक्यतो नोकरी करणा-या स्त्रियांकडून कॉटन व तशाच प्रकारच्या मटेरिअलला जास्त मागणी आहे. याशिवाय सिल्क, दूधमलाई आणि टिकली वर्कलाही पसंती आहे. शक्यतो बदलणा-या पॅटर्नप्रमाणे महिलांच्या मागण्या बदलत असतात.
सध्या मालिकांमध्ये दिसणा-या टिकली वर्कच्या साड्यांना जास्त पसंती आहे. या भरजरी साड्या लग्नसमारंभातही वापरल्या जातात. याशिवाय पार्टिवेअरसाठीही खास साड्या बाजारात उपलब्ध आहेत. अगदी दोनशे रुपयांपासून ते तीस हजारांपर्यंतच्या साड्या बाजारात उपलब्ध आहेत. सध्या लग्नसराई असल्यामुळे समारंभासाठी असलेल्या साड्यांची चलती आहे. त्यात हळदी समारंभासाठी पिवळ्या साड्या, नवरीसाठी शालू तसेच फॅन्सी साड्यांची चलती आहे. रोलप्रेस, बांधणी, कॉटनमध्येही हजारो प्रकारच्या साड्या आहेत. नेटच्या साड्यांनाही चांगली मागणी आहे. पैठणी साड्यांना मध्यमवयीन महिलांकडून जास्त मागणी आहे.
दोनशे ते तीस हजार रुपयांपर्यंत साड्या - बाजारात आज दोनशे रुपयांपासून तीस हजारांपर्यंतच्या विविध साड्या उपलब्ध आहेत. जितकी जास्त किंमत तितक्या साड्या भरजरी असतात. लग्नसमारंभासाठी पाच ते तीस हजारांपर्यंतच्या साड्या विकत घेतल्या जातात. तर रोजच्या वापरासाठी पाचशे ते तीन हजारांपर्यंतच्या साड्या विकत घेतल्या जातात. शक्यतो काम करणा-या महिलांकडून साड्यांची जास्त आणि नेहमी खरेदी होत असते. त्यामुळे विविध प्रकार आणि वेगवेगळ्या रेंजमध्ये साड्या उपलब्ध आहेत.