आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात २५०० सेट टाॅप बाॅक्सचे काम प्रलंबित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातील सहा हजार ३०० केबल ग्राहकांनी फेब्रुवारीअखेर सेटटॉप बॉक्स बसवले असून अडीच हजारांवर सेट टॉप बॉक्स बसवण्याचे काम प्रलंबित आहे. त्यातच सेटटॉप बॉक्स बसवण्यासंदर्भात सरकार न्यायालयाचे निर्देश प्राप्त झाल्यामुळे जिल्हा करमणूक कर अधिकारी, केबल वितरक संभ्रमात आहेत.
सरकारने केबल चालकांना सेटटॉप बसवण्याची नोव्हेंबर महिन्याची मुदत दिली होती. ही मुदत वाढवून देण्याची मागणी केबल चालकांकडून करण्यात आली. त्यानंतर शासनाने त्यांना १५ जानेवारीपर्यंत मुदत वाढवून दिली होती. यादरम्यान सेटटॉप बसवण्याच्या निर्णयाबाबत केबलचालकांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालय शासनाकडून सेटटॉप बॉक्स बसवण्याबाबत अद्याप सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. शासनाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर जिल्हा करमणूक कर शुल्क अधिकारी कार्यालयाकडून अनधिकृत केबल जोडण्यांवर कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे सेटटॉप बाॅक्स बसवण्याबाबत केबल चालकांना सूचनाही देण्यात आल्या. जळगाव शहरासह तालुक्यातील ९२ गावांमध्ये एकूण हजार ४०० केबल जोडणी असलेल्या ग्राहकांनी सेटटॉप बॉक्स बसवले आहेत. जळगाव शहरात हजार ५०४ केबल जोडण्या आहेत. ग्रामीण भागात हजार ४५८ ग्राहकांकडे केबल जोडण्या आहेत. जळगाव तालुक्यात एकूण १३ हजार ९६२ केबल ग्राहक आहेत. यापैकी जळगाव शहरातील हजार ३०० केबल ग्राहकांनी सेटटॉप बॉक्स बसवले असून ग्रामीण भागात केवळ १०० ग्राहकांनी सेटटॉप बॉक्स बसवले आहेत.

चायना मेडबाॅक्सची विक्री
केबलग्राहकांना केबल चालकांकडून चायनामेड सेटटॉप बॉक्सची विक्री करण्यात येत आहे. तीन प्रकारचे सेटटॉप बॉक्स केबल चालकांकडून विक्री करण्यात येत आहेत. मात्र, सेटटॉप बॉक्स विक्रीबाबत आमचे नियंत्रण नसल्याचे जिल्हा करमणूक कर शुल्क अधिकारी विलास हरिमकर यांनी सांगितले.

जिल्ह्यात २८ हजारांवर बसवले सेट टॉप बॉक्स
जिल्ह्यात शहर ग्रामीण मिळून लाख १०० केबल जोडणी असलेले ग्राहक आहेत. यापैकी २८ हजार ३७७ केबल जोडणी असलेल्या ग्राहकांनी सेटटॉप बॉक्स बसवले असून ७१ हजार ६२३ ग्राहकांचे सेटटॉप बॉक्स बसवण्याचे काम बाकी आहे. ग्रामीण भागातील ६७ हजार ५८५ केबल जोडणी असलेल्या ग्राहकांपैकी फक्त जळगाव तालुक्यातील १०० ग्राहकांनी सेट टॉप बॉक्स बसवले आहेत.

१७०० रुपयांपर्यंत सेटटॉप बॉक्स
इम्पॅक्ट२- १२०० रुपयांमध्ये २२० चॅनल्स, इम्पॅक्ट ४- १६०० रुपयांमध्ये ४०० चॅनल्स आणि एचडी सेटटॉप बॉक्स - १७०० रुपयांमध्ये ४०० पेक्षा जास्त चॅनल्स आहेत. या व्यतिरिक्त केबल चालकांकडून वाहतूक खर्च १०० रुपये सेट टॉप बॉक्स बसवण्याचे १०० रुपये आकारण्यात येत आहेत.
बातम्या आणखी आहेत...