आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारा पोलिसांचे निलंबन मागे, पोलिस अधीक्षकांचा निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हा पोलिस दलातील १२ निलंबित कर्मचाऱ्यांचे निलंबन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी शनिवारी मागे घेतले. यात अशोक सादरेंसोबत निलंबित असलेले पोलिस शिपाई जीवन पाटील, राजेंद्र मधुकर चौधरी, श्रावण पांडुरंग पावरा, संजय दगडू अहिरे, वसंत प्रल्हाद सपकाळे, अशोक दगडू कुमावत, चंद्रकांत सुभानराव काळे, शरद देवसिंग राजपूत, विजय तायडे, किशोर सुपडू सपकाळे, अशोक रामदास महाजन, दीपक जगन्नाथ अहिरे यांचा समावेश आहे. या १२ जणांचे तात्पुरते निलंबन मागे घेण्यात आले आहे. भविष्यात त्यांच्या विरोधात करण्यात येणाऱ्या कारवाईस कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही, असे आदेशात म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...