आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Twelveth Examination Evalute Through Central Method

केंद्रीय पद्धतीने बारावीच्या परीक्षेचे मूल्यमापन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - यंदा झालेल्या वेळापत्रकातील बदल लक्षात घेता बारावीच्या पुरवणी परीक्षेतील उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन केंद्रीय पद्धतीने करण्याचा निर्णय विभागीय मंडळाने घेतला आहे. त्यामुळे स्थानिक शिक्षकच आता उत्तरपत्रिकांची तपासणी करणार आहेत.

याची सुरुवात बारावीच्या पुरवणी परीक्षेपासून करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दरवर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात येतात. आतापर्यंत सप्टेंबरच्या अखेरीस या परीक्षांना सुरुवात होत असे; परंतु अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी दहावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा जुलै महिन्यातच घेण्याचा निर्णय झाला. त्यानुसार परीक्षा होऊन निकालही जाहीर झाले. आता बारावीच्या पुरवणी परीक्षेस २९ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. तर फेब्रुवारी- मार्चमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेचेही वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दरवर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात होणारी परीक्षा तिसऱ्या आठवड्यातच सुरू होणार आहे. यामुळे विभागीय मंडळांना कमी मनुष्यबळात अधिक काम करायचे आहे. जळगाव जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी आठ केंद्र निश्चित करण्यात आलेले आहेत. त्यानंतर उत्तरपत्रिका तपासणीसाठी केंद्र निश्चित केले जाणार आहेत.

आतापर्यंतची पद्धत : आतापर्यंतपेपर झाल्यावर पाच ते सात केंद्रांवरील उत्तरपत्रिकांचे एकत्रीकरण करण्यात येत असे. त्यानंतर ज्या शाळेला कस्टोडियन नेमण्यात आले आहे. त्याला यूआयडी कोड डकवण्यात येतो. त्यानंतर उत्तरपत्रिका तपासणीसाठी पाठवण्यात येतात.

अशी असेल नवी पद्धत : विद्यार्थ्यांचीसंख्या कमी असल्याने बारावीच्या पुरवणी परीक्षेपासून प्रायोगिक तत्त्वावर केंद्रीय पद्धतीने मूल्यांकनास सुरुवात करण्यात येत आहे. यंदा नाशिक विभागातील पाच ते साडेपाच हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. मूल्यांकनासाठी स्थानिक शिक्षकांची निवड केली जाईल. केंद्रप्रमुख म्हणून उपप्राचार्यांची निवड करण्यात येईल. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी मंडळातील अधीक्षक, लिपिकाचीही नजर असेल.

असा काढला सुवर्णमध्य : उत्तरपत्रिकांचेमूल्यांकन करण्यासाठी शिक्षक आढेवेढे घेत असल्याने तसेच जागा देण्यासाठी शिक्षण संस्थांनी असहकार्य करण्याच्या प्रकारांमुळे निकाल वेळेत लावण्यात अडचणी येतात. त्यामुळेच केंद्रीय पद्धतीने मूल्यांकन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

निकाल लवकर लागणार
निकाल लवकर लागावे, यासाठी बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय पद्धतीने उत्तरपत्रिका तपासणी करण्यात येणार आहे. देविदास महाजन, शिक्षणाधिकारी,माध्यमिक विभाग