आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामार्गावर दोन: अपघात नियमाचे पालन, दोन बचावले; नियम भंग, दुचाकीस्वार ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नियमाचे पालन : सीटबेल्टमुळे कारमधील दोन बचावले
जळगाव-
महामार्गावरीलरिलायन्स पेट्रोलपंपाजवळ असललेल्या मिल्लत हायस्कूल समोर शुक्रवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास भरधाव वाळू डंपरने समाेरून येणाऱ्या कारला जाेरदार धडक दिली. त्यामुळे कारचा चुराडा झाला. मात्र, कारचालक अाणि बाजूला बसलेल्याने सीटबेल्ट लावलेले असल्याने एअरबॅग्ज उघडल्या. त्यामुळे दाेघांचे प्राण वाचले. 
मोहाडी रस्त्यावरील विनोबानगरातील दीपक शिवचंद लढ्ढा (वय ४६) अाणि मंगल अस्थिमल शर्मा दोघे शुक्रवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास कारने (क्र. एमएच-१९-बीयु-८७०४) अजिंठा चौफुलीकडून इच्छादेवी चाैफुलीकडे येत हाेते. त्या वेळी समाेरून भरधाव येणाऱ्या वाळू डंपरने (क्र. एमएच-१९-झेड-९९९२) समोरुन जाेरदार धडक दिली. या अपघातात कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला. मात्र, कारचालक अाणि बाजूला बसलेल्यांनी सीटबेल्ट लावलेले हाेते. त्यामुळे धडक झाल्याबराेबर एअरबॅग्ज उघडल्याने दाेन्ही किरकाेळ जखमी झाले. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. जखमी दीपक शिवचंद लढ्ढा यांच्या तक्रारीवरुन औद्योगिक वसाहत पोलिसात डंपरचालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून तपास पोलिस नाईक प्रकाश निंबाळकर करीत आहे. 

नियमभंगाचे दुष्परिणाम: हेल्मेट नसल्याने दुचाकीस्वार ठार
जळगाव- अजिंठारस्त्यावरील हाॅटेल मैत्रेयाजजवळ शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात वाहनाने माेटारसायकलला दिलेल्या धडकेत तरुण ठार झाला. धडक दिल्यानंतर माेटारसायकलस्वार तरुण लांब फेकला गेला. त्यात त्याच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाल्याने अतिरक्तस्राव झाल्याने ताे ठार झाला. त्याच्या डाेक्यात हेल्मेट असते, तर कदाचित ही दुर्दैवी वेळ अाली नसती. 

खेडी बुद्रूक येथील गजानन राजेंद्र साेनार (वय २४) हे शुक्रवारी त्यांच्या कुटुंबीयांसह सुप्रीम काॅलनी परिसरातील खुबचंद साहित्यानगरात त्यांच्या मावशीकडे गेले हाेते. शुक्रवारी महाशिवरात्रीनिमित्ताने अायाेजित केलेल्या कार्यक्रमाला ते गेले. कार्यक्रम संपल्यानंतर गजानन यांचा भाऊ दीपक (वय २२) बहीण पूजा अाणि अाई रात्री वाजेच्या सुमारास रिक्षाने घरी अाले. मात्र, गजानन मामाला साेडून येताे असे सांगून निघून गेले. त्यानंतर रात्री १२ वाजेच्या सुमारास अार. एल. चाैफुलीकडून माेटारसायकलवर (क्र. एमएच- १९, एन- ९४४३) अजिंठा चाैफुलीकडे येत हाेते. त्या वेळी समाेरून येणाऱ्या चारचाकी वाहनाने त्यांच्या माेटारसायकलला जाेरदार धडक दिली. त्यामुळे साेनार लांब फेकले गेले. 

त्या वेळी परतीच्या मार्गावर असलेल्या नोकरदार वाहनधारकांनी अपघाताच्या ठिकाणी धाव घेत पोलिसांना घटना कळवली. दुचाकीला धडक दिल्यावर पांढऱ्या रंगाचे चारचाकी वाहन औरंगाबादच्या दिशेने सुसाट वेगात निघून गेले. एमअायडीसी पोलिस ठाण्याचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे अापत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घाेषित केले. पाेलिसांनी अाैरंगाबादकडे पसार झालेल्या वाहनाचा शोध घेतला असता तो सापडला नाही. पवन मंगेश मोरे (रा. खुबचंद साहित्यानगर) यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहनचालकाच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली अाहे. 

चिठ्ठी वरूनपटली ओळख 
मृतगजानन साेनार हे माेटारसायकलवर एकटेच हाेते. त्यांची ओळख पटवणे गरजेचे असल्याने पोलिसांनी मृतदेहाची तपासणी केली. पॅण्टच्या खिशातून निघालेल्या चिठ्ठीत मोबाइल नंबर आढळून आला. ताे पाटील म्हणून काेणाचा तरी हाेता. पाेलिसांनी त्या क्रमांकावर फाेन लावून विचारल्यानंतर गजानन यांची अाेळख पटली. रात्री पाटील यांनी गजानन यांच्या मावशीच्या घरी जाऊन निराेप दिला. त्यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयात येऊन खात्री केली. तर ताे मृतदेह गजानन यांचाच असल्याचे समजले. 

शनिवारी सकाळी गजानन यांच्या मावसभावाने त्यांच्या घरी जाऊन भाऊ दीपक याला जिल्हा सामान्य रुग्णालयात अाणले. त्यावेळी त्याची भाऊ गेल्याचे समजल्यानंतर शुद्धच हरपली. 
बातम्या आणखी आहेत...