आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव एसटीने प्राैढास उडवले, जमावाने गाडीच्या काचा फाेडल्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हा परिषदेकडून भरधाव येणाऱ्या एसटीने शास्त्री टाॅवर चाैकात मंगळवारी सकाळी ७.४५ वाजता शिवाजीनगरातील प्राैढाला जाेरदार धडक दिली. यात ते जागीच ठार झाले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी एसटीच्या काचा फाेडत चालकाला शहर पाेिलसांच्या ताब्यात दिले.
पळसाेद-जळगाव (एमएच २० बीएल ११९७) ही मुक्कामी गाडी मंगळवारी सकाळी टाॅवर चाैकातून वळसा घेऊन नेहरू चाैकाकडे जात हाेती. या वेळी रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या शर्मा दूध येथून प्रकाश मानकुंमरे (वय ५०, रा.शिवाजीनगर) हे चहा पिऊन बाहेर येत हाेते. या वेळी त्यांना एसटीने धडक दिल्यामुळे ते खाली काेसळले. त्यामुळे संतप्त नागरिकांनी एसटीच्या काचा फाेडून चालक सुरेश शिंदे (रा.कानळदा) याला शहर पाेलिसांच्या ताब्यात दिले. काही नागरिकांनी मानकुंमरे यांना सिव्हिलमध्ये दाखल केले. मात्र, त्यांच्या मेंदूत छातीत अतिरक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाल्याचे डाॅ.अजय साेनवणे यांनी सांगितले. याप्रकरणी रवींद्र काेंढाळकर यांच्या फिर्यादीवरून शहर पाेलिसात गुन्हा दाखल झाला अाहे.
मानकुंमरे कुटुंब उघड्यावर
मानकुंमरेयांना दाेन भाऊ हाेते. त्यापैकी लहान भाऊ प्रवीण याचा मे महिन्यात अाजाराने मृत्यू झाला हाेता; तर नितीन हा घर साेडून निघून गेला अाहे. सर्व कुटुंबाची जबाबदारी प्रकाश मानकुंमरे यांच्यावर हाेती. ते चित्रा चाैकातील नाश्त्याच्या गाडीवर मजुरीकरून उपजीविका भागवत हाेते. ते त्यांची वहिनी, पुतणी काजल (वय १३) दाेन पुतणे विशाल (वय ११), अादित्य (वय ९) यांच्यासाेबत राहत हाेते. त्यांच्या मृत्यूमुळे सर्व कुटुंबच उघड्यावर अाले अाहे.
शहरात गतिराेधकांचा अभाव
शहरात नकाे असलेल्या ठिकाणी गतिराेधक अाहेत. मात्र, वर्दळीचा असलेल्या टाॅवर, नेहरू चाैकात गतिराेधक नाहीत. टाॅवर चाैकात जर गतिराेधक असते तर मंगळवारी एसटीचा वेग कमी हाेऊन अपघात टळला असता.
दाेन कि.मी.च्या अंतरात १३ थांबे
नवीन बसस्थानकातून चाेपडा, यावल, कानळदा, अाव्हाणे, अासाेदा, भादली, ममुराबाद अादी गावांना जाण्यासाठी एसटीगाड्या काेर्ट चाैक, नेहरू चाैक, टाॅवर चाैकमार्गे काही बस जिल्हा परिषदेकडून तर काही वाल्मीकनगरमार्गे जातात. शहरातील दाेन किलाेमीटरच्या अंतरात १३ बस थांबे अाहेत. त्यात शहरातून बाहेर जाताना काेर्टाच्या बाजूला, गाेविंदा रिक्षा स्टाॅप, खान्देश मिल काॅम्प्लेक्स, शारदा बुक डेपाेसमाेर, मुखर्जी उद्यानाच्या बाजूला, शिवाजीनगरातील मनपा शाळा जवळ थांबे अाहेत. तसेच बाहेर गावाहून शहरात येणाऱ्या बसला मनपाच्या शाळा क्रमांक जवळ, जिल्हा परिषदेजवळ, टाॅवर चाैकातील धीरज कलेक्शनजवळ, मनपा इमारतीसमाेर अािण शिवतीर्थ मैदानाजवळ थांबे अाहेत. या १३ थांब्यांपैकी खान्देश मिल काॅम्प्लेक्सजवळचा अाणि शिवतीर्थ मैदानासमाेरचा थांबाच अधिकृत अाहे.जळगाव स्वातंत्र्यचौकातून भास्कर मार्केटकडे जात असताना दारुड्या चालकाने रिक्षा चक्क दुभाजकावर घातली. त्यात ताे गंभीर जखमी झाला अाहे. ही घटना पोलिस मुख्यालयाच्या गेटसमोर मंगळवारी दुपारी १.४५ वाजता घडली.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, आणखी एक अपघात..