आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Accidents On The National Highway, Two Killed

राष्‍ट्रीय महामार्गावर दोन अपघात; दोघे ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर गुरुवारी सकाळी 8.30 आणि दुपारी 4.30 वाजता झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जखमी, तर दोन जणांचा मृत्यू झाला.

हिमालय ढाब्यासमोर सकाळी 8.30 वाजता हुकूमचंद नामदेव पाटील (वय 650, सखाराम पाटील (वय 60, दोघे राहणार विटनेर) हे दोघे दुचाकीने (एमएच-19, एक्यू-225) जळगावकडे येत होते. समोरून येणार्‍या ट्रेलरने (जीजे-18, एयू-9052) धडक दिल्याने ते दोघेही जागीच गतप्राण झाले. अपघातात दुचाकी पूर्णपणे चक्काचूर झाली. याप्रकरणी दिलीप लीलाचंद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रेलरचालक राजेश ब्रीजबिहारी (रा.अमराई, अहमदाबाद) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून ट्रेलरचालक फरार आहे.

एसटीचे वाहक जखमी

गुरुवारी दुपारी 4.30 वाजता जळगावहून पाळधीकडे दुचाकीने (एमएच-19, बीसी-0718) जात असलेले सचिन पाटील (वय 28), रवींद्र पाटील (वय 27, दोघे रा. आव्हाणे) यांच्या दुचाकीला मेटॅडोअरने (एमएच-01, एच-910) समोरून धडक दिली. बांभोरी येथील एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या गेटसमोर हा अपघात झाला. यात दोघेही जखमी झाले आहेत. सचिन पाटील हे जळगाव डेपोत वाहक आहेत. रवींद्र पाटील यास डॉ. राजेश जैन यांच्या रुग्णालयात तर सचिन पाटील यांचा उजवा पाय फ्रॅर झाल्यामुळे त्यांना खडके अँक्सिडेंट हॉस्पिटल येथे दाखल केले आहे.