आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुश‌खबर! शहरात अडीच काेटींचे रस्ते, गटारींच्या कामांना मंजुरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेच्या तिजाेरीत खणखणाट असताना शासनाच्या विविध याेजनांमधून शहरात रस्ते गटारींच्या कामांना लवकरच सुरुवात हाेणार अाहे. सुवर्ण जयंती नगराेत्थान अभियान नागरी दलितेतर वस्ती सुधारणा याेजनेसह दलित वस्ती सुधारणा याेजनेतून सुमारे अडीच काेटींच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली अाहे. त्यात सुमारे १४ कामे हाती घेण्यात येणार अाहेत.

महापालिकेत कधी डांबरअभावी, तर कधी खडी उपलब्ध हाेत नसल्याने रस्त्यांच्या कामांना ब्रेक लावण्याची वेळ अधिकाऱ्यांवर येत अाहे. दीड महिना उलटूनही जलतरण तलावाच्या भिंतींचे बांधकाम पूर्ण हाेऊ शकलेले नसून, त्यासाठी वाळू मिळत नसल्याचे कारण पुढे केले जात अाहे. त्यामुळे सध्या महापालिका प्रशासनाला केवळ शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानातून नागरिकांच्या गरजा पूर्ण कराव्या लागत अाहेत. एकीकडे मूलभूत सुविधा दिल्या जात नसताना दुसरीकडे मात्र करवसुलीसाठी तगादा लावला जात असल्याचे पाहायला मिळत अाहे. तथापि, अाता शासनाच्या विविध याेजनांमधून काही भागात कामांना सुरुवात हाेणार अाहे. त्यात अारसीसी गटार बांधणे, रस्त्यांचे डांबरीकरण अादी कामे केली जाणार अाहेत. त्यासाठी महापालिका प्रशासनाने दिलेल्या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली अाहे.

विविध योजनांच्या माध्यमातून शहरात रस्ते गटारींच्या कामांचा प्रश्न मार्गी लागत असल्याने ही जळगावकरांसाठी चांगली गोष्ट आहे. शहरातील बऱ्याच उपनगरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना अनेक यातना सहन करून या रस्त्यांनी मार्गक्रम व्हावे लागते. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे पाठदुखीच्या समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने विविध योजनेच्या माध्यमातून का होईना, उपनगरातील रस्त्यांची कामे मार्गी लावावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

नागरी दलितेतर वस्ती सुधारणा याेजना : नागरी दलितेतर वस्ती सुधारणा याेजनेतून मेहरूण वैकुंठधामजवळ पूल बांधणे मेहरूण ते वैकुंठधाम राेडवर अारसीसी गटार बांधण्यासाठी २३ लाख ८७ हजार ७४५ रुपये, त्र्यंबकनगरमधील चंद्रलाेक अपार्टमेंट ते संभाजीनगर चाैकापर्यंत डांबरी रस्ता रिसर्फेसिंग करण्यासाठी लाख १३ हजार ४६९ रुपये, तांबापुरामध्ये गरीब नवाज किराणापासून ते हनुमान मंदिरापर्यंत गटारीसाठी लाख ७१ हजार ४३२ रुपये, तांबापुरामध्ये बिलाल चाैकापासून ते नॅशनल हायवेपर्यंत महंमदियानगरमध्ये अारसीसी गटार बांधण्यासाठी लाख हजार ४८८ रुपये असा ४७ लाख ७६ हजार १३४ रुपयांचा निधी मंजूर करण्यात अाला अाहे.
‘नगराेत्थान’ महाअभियानांतर्गत : अयाेध्यानगरातमहामार्गापासून ते मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी ३९ लाख १३ हजार ९१८ रुपये, मेहरूणमधील डीपी रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी १८ लाख ३७ हजार ७२९ रुपये, रिंगराेड ते ख्वाजामियॉं चाैकापासून ते रेल्वेगेटपर्यंतच्या रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी २६ लाख ७६ हजार ७७७ रुपये, युनिटी चेंबरपासून उत्तरेकडील मधुबन अपार्टमेंटपर्यंतच्या रस्ता डांबरीकरणासाठी २१ लाख ७१ हजार ५७६ रुपये असा काेटी लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात अाला अाहे.

नागरी दलित वस्ती सुधारणा याेजना : भाेईटे गल्ली, भावसार मढी, चाैधरीवाडा येथील रस्ते कॉंक्रिटीकरणासाठी १० लाख, राम मंदिर ते चाैधरीवाडा रस्ता कॉंक्रिटीकरणासाठी १४ लाख, पंचशील साेसायटीतील रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणासाठी १७ लाख ९६ हजार ३११ रुपये, समतानगर परिसरात कॉंक्रिट पाथवे तयार करण्यासाठी ११ लाख २४ हजार ७४५ रुपये, मेहरूणमधील अजिंठा हाैसिंग साेसायटी परिसरातील रस्ते डांबरीकरणासाठी २४ लाख ६३ हजार रुपये, अजिंठा हाैसिंग साेसायटी परिसरातील अारसीसी गटारीसाठी २० लाख ७३ हजार रुपये असा ९८ लाख ५७ हजार ५६ रुपयांचा निधी नागरी दलित वस्ती सुधारणा याेजनेतून मंजूर करण्यात आला अाहे.