आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुसावळात घरफोडी करणारे दाेघे एलसीबीच्या जाळ्यात; चोरी केलेल्या टीव्हींसह मुद्देमाल हस्तगत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- भुसावळ शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाच घरफोड्या करुन धुमाकूळ घालणाऱ्या दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले अाहे. या चोरट्यांकडून पाच एलएडी टीव्ही, सोने-चांदीचे दागिने, मोबाईल असा लाख ९४ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला अाहे. 


भुसावळ येथील हनुमान मंदिराजवळ राहणाऱ्या अदील नबी कामिल शेख (वय ३०) अमिन शेख सिराज (वय २४)या दाेघा संशयितांना पाेलिसांनी ताब्यात घेतले अाहे. भुसावळात गेल्या चार-पाच महिन्यात घरफोडी हाेण्याचे सत्र सुरु आहे. अशात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना अटक केल्यानंतर त्यांनी पाच ठिकाणी केलेल्या घरफोड्यांची कबुली देत चोरीचा मुद्देमाल देखील काढून दिला आहे. भुसावळ शहरात होणाऱ्या घरफोड्यांच्या संदर्भात एलसीबीच्या पथकाने समांतर तपास सुरु केला होता. पोलिस निरीक्षक सुनील कुराडे यांना संशयितांबद्दल मिळालेल्या गुप्त माहितीच्या अाधारे १६ नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांचे दोन स्वतंत्र पथक तयार करून भुसावळत सापळा रचला होता. दरम्यान, यात अदील नबी याच्याकडे महागडा टॅब असल्याचे आढळून आले. त्याने सिराज सोबत घरफोड्या केल्या असल्याची माहिती पथकांना मिळाली होती. त्यानुसार पहिल्यांदा अदील याला ताब्यात घेण्यात आले. खाक्या दाखवताच त्याने अमिन सोबत घरफोड्या केल्याची कबुली दिली. 


जप्त केलेला मुद्देमाल 
यादोघांकडून पाच एलएडी टीव्ही, एक महागडा टॅब, सोने-चांदीचे दागिने असा एकूण लाख ९४ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. त्या दाेघांना भुसावळ शहर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.  

बातम्या आणखी आहेत...