आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्यात स्वाइन फ्लूचे दोन रुग्ण आढळले; डेंग्यूचा फैलाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
धुळे- शहरात स्वाइन फ्लूचे दोन रुग्ण आढळले आहेत. डेंग्यू, मलेरियाचेही प्रमाण वाढत आहे. खबरदारी घेण्याचे आवाहन मनपाच्या अारोग्य विभागाने केले आहे. 

जुलै महिन्यात डेंग्यूचा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. तर थंडी-तापाच्या तक्रारी होत आहेत. शहरात स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळत आहेत. त्यातून दोन जणांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. खासगी रुग्णालयात या रुग्णांनी उपचार घेतला आहे. त्याप्रमाणे अजूनही काही स्वाइन फ्लूचे संशयित खासगी रुग्णालयात उपचार घेत अाहे. तर शहरातील तीन जण मुंबई येथील रुग्णालयात उपचार घेत असल्याचे समजते. स्वाइन फ्लूचे लक्षणे ताप येणे, सर्दी-खोकला येेणे, घसा दुखणे, अतिसार, उलट्या होणे, श्वास घेण्यास त्रास हाेणे, अंग दुखणे आदी प्रकार आहे. त्यामुळे नागरिकांना अशी लक्षणे दिसल्यास तत्काळ दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावयाचा आहे. तर खबरदारी म्हणून सर्दी खोकला अालेल्या व्यक्तीने घरीच थांबावयाचे आहे. 

गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, वारंवार हात साबनाने स्वच्छ पाण्याने धुवावे, घरातील टेबल, टिपॉय, संगणकाचा की बोर्ड यासारखे पृष्ठ भाग सतत स्वच्छ करावे, असे आवाहन महापालिका आरोग्य विभागाने केले आहे. 

मनपाकडे माहिती नाही 
शहरातील खासगी दवाखान्यांमध्ये स्वाइन फ्लू रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याची गरज आहे. परंतु, खासगी रुग्णालयांकडून महापालिका अारोग्य विभागाकडे काहीही माहिती आलेली नाही.  
- डॉ.महेश मोरे, अारोग्याधिकारी, मनपा 
बातम्या आणखी आहेत...