आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धरणगाव तालुक्यात दोन अल्पवयीन मुलींचे विवाह रोखले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धरणगाव - तालुक्यातील भोद खुर्द येथे एकाच मांडवात होणार्‍या दोन विवाहात दोन्ही वधूंचे वय कमी असल्याने हे विवाह दक्षता समितीच्या सदस्या निवेदिता ताठे व भारती म्हस्के तसेच सप्तशती मंडळाच्या सदस्यांनी मंगळवारी रोखले. त्यांच्यासोबत जळगावच्या अमर चाइल्ड लाइनच्या कार्यकर्त्यांसह पोलिस हजर होते. यात वधू जागृतीचे वय दीड वर्षे तर कविताचे वय तीन महिने कमी आहे.

लग्नासाठी मुलीचे वय 18 व मुलाचे 21 असावे, असा कायदा आहे. परंतु वधू जागृतीचे वय साडेसोळा तर कविताचे वय 17 वर्षे नऊ महिने होते. या दोन जोडप्यांच्या विवाहातील दोन्ही वर सख्खे चुलत भाऊ आहेत. जागृतीच्या सोबत गणेशचे लग्न ठरले होते. त्याचे वय 23 आहे. कविता सोबत कैलास उर्फ मोहनचे लग्न ठरले होते. त्याचे वय 24 आहे. दोन्ही मुलींचे वय कमी असल्याचे वर-वधूंसह त्यांच्या पालकांच्या लक्षात आणून देण्यात आले. त्यामुळे लग्न न लावताच वर्‍हाडी मंडळीस जेवण करून परतावे लागले. भोद खुर्द येथे गोकूळ मोतीराम पाटील यांचा मुलगा मोहन उर्फ कैलास तर शिरसोली येथील मुरलीधर तुकाराम पाटील यांची मुलगी गीता उर्फ कविता हिच्याशी होणार होता.