आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कारच्या काचा फोडून चोरी करणारे दोघे जेरबंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- आकाशवाणी चौकात उभ्या असलेल्या होंडा सिटी कारच्या काचा फोडून त्यातून दीड लाख रुपयांसह दोन मोबाइल महत्त्वाची कागदपत्रे लांबविले होते. याप्रकरणी एलसीबीच्या पथकाने दोन जणांना अटक केली आहे.
आकाशवाणी चौकात २९ जानेवारी रोजी ही घटना घडली होती. तेव्हापासून या टवाळखोरांचा शोध सुरू होता. तपासासाठी एलसीबीच्या १० जणांचे पथक तयार करण्यात अाले होते. या पथकाने सय्यद इरफान सय्यद युसूफ (वय ३५, खंडेरावनगर पिंप्राळा-हुडको) मोहसीन बेग हसन बेग (वय २६, शहाइलिया मशीदजवळ, तांबापुरा) या दोघा टवाळखोरांना ताब्यात घेण्यात आले आहे.
त्यांच्याकडून चोरलेला मोबाइल त्यांच्याकडून हस्तगत केला आहे. त्यांना पुढील तपासासाठी दोघांना रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कामगीरी एलसीबीच्या पथकातील विजय पाटील, श्रीकृष्ण पटवर्धन, रवींद्र गिरासे, चंद्रकांत पाटील यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...