आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षातून दोनच दिवस सुटी, कोड सिस्टम हेच यशाचे गमक :सुभाष तळेकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव: मुंबईच्या डबेवाल्यांचे व्यवस्थापन केवळ मुंबईतच चालणारे असून इतर शहरात ते अमलात आणण्यासाठी प्रशिक्षण दिले गेले. परंतु ते यशस्वी होऊ शकले नाही. त्यामुळे हजारो डबे सुरळीत पोहोचवण्याच्या व्यवस्थापनाबाबतच्या तंत्रज्ञानाची भुरळ सर्व जगाला पडली अाहे.
 
डबेवाल्यांचे कार्य आज सर्व जगभर पसरले आहे, असे प्रतिपादन मुंबईच्या डबेवाला संघटनेचे सचिव सुभाष तळेकर यांनी गुरुवारी केले. बांभोरी येथील एसएसबीटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आयोजित पाचव्या फिस्ट या व्याख्यानमालेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. आर.एच. गुप्ता अध्यक्षस्थानी होते. 
 
व्यासपीठावर कॉलेज व्यवस्थापन समितीचे सदस्य आर्किटेक्ट शशिकांत कुलकर्णी. डॉ.एस.पी. शेखावत, प्राचार्य डॉ. के. एस. वाणी, प्रा. बी. सी. काछवा, प्रा.डॉ. एस.आर. सुरळकर, प्रा.डॉ. जी. के. पटनायक, प्रा. डॉ. यू.एस. भदादे कार्यक्रम समन्वयक प्रा व्ही. पी. सांगोरे उपस्थित होते. 
 
उद्घाटनानंतर ‘डबे वालोकी कहानी, डबेवाले की जुबानी’ या विषयावर तळेकर यांनी डबेवाल्यांच्या कार्याची माहिती अतिशय रोचक पद्धतीने सादर केली. डब्यांच्या योग्य व्यवस्थापनामुळे आमचे व्यवस्थापन आज जग मान्य झाले आहे. ते सर्व जगात शिकवले जाते आहे. याला कारण शिस्तबद्धता, वेळ पाळणे.
 
 प्रत्येकाला त्याचा डब्बा अचूकतेने पोहोचवणे, ते ही किंचीतही चूक होऊ देता. या यशाचे गमक सांगताना ते म्हणाले, आम्ही कोड सिस्टिम, सप्लाय चैन फ्लोर लॉजिक, टेक्नॉलॉजी बॅकअप यामुळे आम्ही हे सर्व काम व्यवस्थितरीत्या करू शकतो, असे ते म्हणाले. प्राचार्य डॉ.के. एस. वाणी यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष डॉ. गुप्ता यांनी आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. प्रा. वि. पी. सांगोरे यांनी प्रास्ताविक केले. 
 
चुकीला माफी नाही 
आमच्याकडे चुकीचे प्रमाण केवळ टक्का आढळते. आम्ही कधीही संप करीत नाही. वर्षातून आषाढी एकादशी आणि कार्तिकीला सुटी घेतो. आमचेकडे कोणीही नशा करीत नाही. टीम लीडर सूचनेचे पालन करतो आणि सर्व काम अचूक वेळेत करतो. आमचे ५००० सदस्य असून रोज लाख डब्बे पोहोचवतो आणि तितकेच परत नेऊन देतो. आमच्या ४०० टीम असून पर्यायी व्यवस्था ही केली आहे. लोकल ही मुंबई प्रमाणेच आमचीही जीवन वाहिनी आहे. त्यामुळे आम्ही आमचे काम वेळेवर करू शकतो, असेही तळेकर म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...