आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अारटीअाे पाठलाग करीत असताना अपघात, भरधाव ट्रकने दाेघांना चिरडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संदीप निंबाळे, विनोद मेतकर - Divya Marathi
संदीप निंबाळे, विनोद मेतकर
पाचोरा- जळगाव येथील आरटीओ पथक ट्रकचा पाठलाग करत असल्याने शहराकडे येणाऱ्या भरधाव ट्रकने दोन दुचाकींवरील दोघांना चिरडले. त्यानंतर हा ट्रक नजीकच्या हॉटेलात शिरल्याने वडापाव विक्रेते वृद्ध दाम्पत्य जखमी झाले.ही घटना गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पाचाेरा शहराबाहेरून जाणाऱ्या मुंबई-नागपूर महामार्गावरील जारगाव चौफुलीवर घडली. 

पाचोऱ्याकडे तुरीची डाळ घेऊन एक ट्रक (एमएच ०४ बीके २०४७) येत हाेता. या ट्रकने दाेन दुचाकींना (एमएच १९ बीके ५७८८ एमएच १९ बीएन ३६७) धडक दिली. यात दुचाकीवरील संदीप निंबाळे (वय २५, रा.पाचोरा) विनोद मेटकर (वय २७, रा.बिल्दी) यांचा मृत्यू झाला. दाेघ दुचाकींना चिरडल्यावर ट्रक जवळच्या हॉटेलात शिरला. यात वडापाव विक्रेते देवराम कोळी भिकूबाई कोळी हे वृद्ध दाम्पत्य जखमी झाले. याबाबत माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक केशव पातोंड, निरीक्षक श्यामकांत सोमवंशी यांनी घटनास्थळ गाठले.अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेऊन काही वेळात परिस्थिती नियंत्रणात अाणली. याप्रकरणी ट्रकचालक बिस्मिल्ला बागवान (पाचोरा) यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखलचे काम सुरू होते. 
 
अतिक्रमणामुळे अपघात 
जारगावचौफुलीवरील वाढत्या अतिक्रमणामुळे अपघात वाढत आहेत. ही समस्या देखील या युवकांचा बळी घेण्यास कारणीभूत असल्याचे संतप्त जमावाने सांगितले. तसेच ट्रकचा पाठलाग करणारे आणि वाहतूक नियमांची अंमलबजावणी करणारे आरटीओचे पथक घटनास्थळी मदतीसाठी थांबल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.  
बातम्या आणखी आहेत...