आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारोळ्यात अपघात; दाेघा मित्रांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारोळा - ट्रकने धडक दिल्याने मोटारसायकलीने जाणार्‍या दोन मित्रांचा शुक्रवारी मृत्यू झाला. किसान कॉलेज जवळ हा अपघात झाला. हे दोघे परीक्षा देण्यासाठी पाराेळ्यात येत होते.

वेल्हाणे येथील योगेश भालेराव पाटील (वय २२) गणेश वसंत पाटील (वय २१) हे सकाळी वाजता मोटारसायकल (एमएम १९ बी २९३०२) ने पारोळ्यात येत हाेते. मुक्त विद्यापीठाची परीक्षा देण्यासाठी ते िकसान काॅलेजमध्ये येत होते. किसान कॉलेजजवळ वळण घेत असताना जळगावकडून येणारा ट्रक (एमएन ३२ क्यू ४२४२) ने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलस्वार योगेश भालेराव पाटील याचा जागीच तर मागे बसलेला गणेश पाटील याचा धुळे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला .

योगेश हा पुणे येथे खासगी कंपनीत नोकरीस तर गणेश हा पुणे विद्यापीठात शिपाई होता. १५ दिवसांपूर्वी गणेशच्या मोठ्या भावाचे लग्न असल्याने तो गावी आला होता. परीक्षा देऊन परत पुणे येथे जाणार होते.