आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गव्हाणे फाट्याजवळ दोन ठार, पोलिस वाहनावर दगडफेक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शिंदखेडा तालुक्यातील गव्हाणे फाट्याजवळ भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात दोन्ही भावंडे ठार झाले. घटनास्थळी पोलिस उशिरा अाल्याने संतप्त गावकऱ्यांनी पोलिस वाहनावर दगडफेक केली. पोलिसांना धक्काबुक्कीचा प्रकार घडला.
नरडाण्याजवळील गव्हाणे फाट्याजवळ भरधाव जाणाऱ्या ट्रक (एम.एच.१८/ए.ए.१६६९) ने मोटारसायकल (एम.एच.१८/ए.के..८३५३)ला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील नथ्थेसिंग विठ्ठलसिंग गिरासे (४८), संपतसिंग विठ्ठलसिंग गिरासे (५०, दोघे रा. धांदरणे, ता. शिंदखेडा) हे दाेघे भावंडे ठार झाले.
अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. घटनेनंतर नरडाणा पोलिसांचे पथक नेहमीप्रमाणे उशिरा पोहाेचले. तोवर परिसरातील नागरिकांची अपघातस्थळी गर्दी झाली होती. दोन जण ठार होऊनही गांभीर्य लक्षात घेता उशिरा येणाऱ्या पोलिसांना नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागले. यातून संतप्त जमावाने पोलिस वाहनावर दगडफेक केली. तसेच शासकीय वाहनाचे नुकसान केले. एवढेच नव्हे तर काही पोलिस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. यानंतर आलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी नागरिकांना आश्वासन देऊन शांतता ठेवण्याचे आदेश दिले. नरडाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू हाेते.

पोलिस उशिरा आल्याने नागरिक संतप्त
घटनेचेगांभीर्य ओळखून नरडाणा पोलिस लागलीच दाखल होत नाही, असा गावकऱ्यांचा आरोप आहे. गेल्या आठवड्यात नरडाणा येथील रेल्वे काॅलनीत एका अधिकाऱ्याच्या पत्नीने आत्महत्या केल्यानंतरही येथील खान नामक उपनिरीक्षकाला घटनास्थळी जाणे गरजेचे वाटले नव्हते, असा आरोप त्या वेळीही झाला होता. त्या अनुभवाची प्रचिती मंगळवारी पुन्हा आली.