आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगकाम करताना हायटेन्शन वायरला स्पर्श झाल्याने 2 जणांचा मृत्यू; 1 गंभीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळ्यात वीजेचा धक्का बसल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. - Divya Marathi
धुळ्यात वीजेचा धक्का बसल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव/धुळे- नवरात्राेत्सवासाठी मंदिराला रंग देतांना दोघांचा मंदिराच्या मागील बाजूने गेलेल्या ११ हजार केव्हीच्या उच्च दाब वीजवाहिनीला स्पर्श झाला. त्यामुळे साेमवारी दाेघांचा मृत्यू झाला. या घटनेत एक जण जखमी झाला आहे. या घटनेनंतर वीज कंपनीवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शहर पाेलिस ठाण्याच्या आवारात तासभर ठिय्या अांदाेलन केले. मृतांना प्रत्येकी दहा हजारांची मदत दिल्यानंतर अांदाेलन मागे घेण्यात अाले.
   
शहरातील रंगारी चाळीत श्री िचंचणी मायाक्का देवी मंदिर व नागेश्वर मंदिर अाहे. मंदिराला नवरात्राेत्सवाच्या पार्श्वभूमीवर रंग दिला जात होता.  या कामासाठी साक्री राेडवरील जमनागिरी परिसरातील काही तरुण राेजंदारीने काम करत होते.  मंदिराच्या कळसाला गाेरख पांडुरंग बाेरसे (वय ३३) अाणि बादल  दामू माेरे (वय २२)  हे तर प्रकाश पांडुरंग माेरे हा अातील बाजूला व नितीन मेजर सूर्यवंशी हा इतर भागाला रंग देत होता.  दुपारी दीड वाजेच्या सुमारास रंगकाम करीत असताना गाेरख बाेरसे व बादल माेरे यांचा मंदिराच्या मागील बाजूूने गेलेल्या ११ हजार केव्हीच्या उच्च दाब वीजवाहिनीला स्पर्श झाला. त्यामुळे दाेघेही विजेच्या धक्क्याने फेकले गेले. या वेळी नितीन सूर्यवंशी काय झाले हे पाहण्यासाठी गेला असता ताेही फेकला गेला. विजेचा धक्का लागल्याने गाेरख व बादल जमिनीवर पडले. त्यात दोघांचा मृत्यू झाला हाेता.  याबाबत अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात अाली अाहे.  
 
दाेन्ही घरांचा अाधार गेला...
या घटनेत मृत झालेले गाेरख बाेरसे व बादल माेरे हे दाेघे घराचा अाधार हाेते. गाेरख बाेरसे हा रंगकाम करून उदरनिर्वाह चालवत हाेता. त्याला पत्नी, अाई, दाेन लहान मुले व दाेन बहिणी अाहेत. ताेच घरात एकटा कमवता हाेता. तसेच बादल माेरेही लहानमाेठी कामे करून घरात मदत करत होता. तो रंगकामासाठी प्रथमच गेला हाेता. त्याच्या पश्चात अाई-वडील, एक भाऊ, दाेन बहिणी अाहेत. एका बहीण अविवाहित अाहे. त्याचे वडील नगरपालिकेत राेजंदारीने काम करतात. घटनेत दाेघांचा मृत्यू झाल्याने बाेरसे व माेरे परिवाराचा माेठा अाधार गेला.
 
प्रत्येकी दहा हजारांची मदत
वीज कंपनीच्या नियमानुसार पाेेलिसांचा अहवाल प्राप्त झाल्यावर संबंधितांना एक ते चार लाखांपर्यंत मदत दिली जाईल. जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न राहील. तूर्त प्रत्येकी दहा हजार रुपये तातडीची मदत करण्यात अाली अाहे. .
- के.डी. पावरा, कार्यकारी अभियंता, महावितरण.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...