आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसगावात बंधाऱ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी- तालुक्यातील तिसगाव येथील दोन शाळकरी मुले मंगळवारी दुपारी शेळ्या चारण्यासाठी लवांडे वस्ती परिसरात गेले. बंधाऱ्याला पाणी आल्याने या मुलांना अंघोळ करण्याचा मोह झाला. मात्र, पोहता येत नसल्याने दोन्ही मुलांचा बुडून मृत्यू झाला.

सनी ऊर्फ किरण पाटेदार (१४) हा मुलगा उन्हाळ्याच्या सुटीत पुण्याहून तिसगावला मामाकडे आला होता. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास तो सिमोण गोरक ससाणे (१५) लवांडे वस्ती परिसरात शेळ्या चारण्यासाठी गेले. गेल्या दोन दिवसांपासून तिसगाव परिसरात पाऊस पडत असल्याने बंधाऱ्याला पाणी आले आहे. शेळ्याला पाणी पाजता पाजता आंघोळ करावी, म्हणून ही मुले बंधाऱ्यात उतरली. बंधाऱ्यात गाळ असल्याने आतमध्ये ओढले जाऊन चिखलात रुतून बसले. पोहता येत नसल्याने पाण्यात बूडून त्यांचा अंत झाला. मुले घरी जेवायला आली नाहीत, म्हणून कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. लवांडे वस्ती परिसरात शेळ्या चरताना आढळल्या. मात्र, मुले नसल्याने शोधाशोध करण्यात आली. बंधाऱ्याच्या मध्यभागी त्यांचे मृतदेह तरंगताना आढळले. या घटनेमुळे संबंधित कुटुंबांसह सगळ्या गावावर शोककळा पसरली.
बातम्या आणखी आहेत...