आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Two Engineering Students Create 'Baby Names Data Base " Appe

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यार्थ्यांनी तयार केले ‘बेबी नेम’ अ‍ॅप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातीलअभियांत्रिकीच्या दोन विद्यार्थ्यांनी ‘बेबी नेम डाटा बेस’ हे एक आगळे-वेगळे अ‍ॅप तयार केले आहे. यात १५ जाती-धर्मातील लहान मुलांची नावे त्यांच्या अर्थांसहीत पाहायला मिळत आहेत. घरात लहान मूल येणे ही प्रत्येकासाठी आनंदाची बाब असते. ते मूल झाल्यानंतर मुलाचे नाव काय ठेवावे? हा प्रश्न प्रत्येकालाच सतावत असतो. या समस्येवर उपाय म्हणून गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील दर्पण पाटील देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयाचा संकेत पाटील या िद्वतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी हे नवे अ‍ॅप बनवले आहे.

आजकाल नवनवीन नावे ठेवण्याकडे कल अधिक असतो. अनेकजण बाळ जन्माला येण्याअगोरच नाव ठेवून मोकळे होतात. अशा वेळी कोणते नाव बाळाला चांगले राहील त्याचा अर्थ काय असेल? याबाबतची माहिती या अ‍ॅपवरून कळणार आहे.
एवढ्या सगळ्या नावांचा शोध या दोघांनी गुगलवर सर्च करून घेतला आहे. त्यांचा अर्थ शोधून तो अभ्यासला आणि दोन आठवड्यात हे अ‍ॅप तयार केले आहे. या आधी या दोघांनी रेल्वे टाइमटेबल तयार केले होते. आतापर्यंत एक लाख लाेकांनी ते डाउनलाेड केले आहे. हे अ‍ॅप मोफत उपलब्ध असून ऑफलाइन पद्धतीने हाताळले जाते. टू झेडनुसार अनेक नावांचा यात समावेश करण्यात आलेला आहे.

१५ कॅटेगिरीज
‘बेबीनेम डाटा बेस’ हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे त्याचा ऑफलाइनदेखील वापर करता येऊ शकणार आहे. यात १० लाखांपेक्षा अधिक नावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये १५ कॅटेगिरीज पाहायला मिळतात. अरेबिक, मुस्लिम, आसामी, बंगाली, ख्रिश्चन, गुजराती, िहंदू, कन्नड, मल्याळम्, मराठी, पंजाबी, संस्कृत, िहंदी, िसंधी, तामिळ, तेलगु या जाती-धर्मांतील नावांचा समावेश यात करण्यात आलेला आहे. मुली आणि मुले या दोघांची नावे यात असून ‘फेव्हरेट ऑप्शन’ देण्यात आलेले आहे.