आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोमियोंनी फूस लावून दोन मुलींना पळवले, मुलींच्या पालकांची पोलिसांत धाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव- शहरातील डेराबर्डी आनंदवाडी परिसरातील अल्वयीन मुलींना फूस लावून पळवल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पालकांच्या तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला. 

मुलींचा शोध घेऊन आरोपींना अटक करावी या मागणीसाठी मुलीच्या पालकांसह संबधितांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. एका कॉलनी परिसरातील मुलीला तिच्या घराजवळून अजय राधेश्याम चौधरी याने फुस लावून दुचाकीवर पळवून नेले. याबाबत मुलाच्या घरच्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाल्याने मुलीच्या वडिलांनी शहर पोलिस ठाण्यात तरुणाच्या विरोधात तक्रार दिली. दुसरी घटना शहरालगतच्या डेराबर्डी येथे घडली. शहरातील शाळेत शिकणाऱ्या मुलीस २५ जुलै रोजी दुपारी १२ वाजता तिच्या शाळेजवळून शिर्डी तालुक्यातील पुणतांबा येथील कुणाल रमेश साठे (वय १८) या तरूणाने पळवून नेले. मुलीचा शोध घेतला असता मुलगी मिळून आली नाही. या प्रकरणी मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. 
बातम्या आणखी आहेत...