आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Groups Pelting Stone On Eachother In Jalgaon

जळगाव मनपा निवडणुकीच्या वादातून दोन गटात दगडफेक, अभियंत्यासह 4 जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - प्रतिस्पर्धी उमेदवारासाठी काम करत असल्याच्या कारणावरून माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवकांच्या गटात महापालिका निवडणुकीच्या वेळी रविवारी दुपारी दगडफेक झाली. पालिकेतील कनिष्ठ अभियंता विजय मराठे यांच्यासह चार जण जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक पाचमधून माजी उपमहापौर मिलिंद कोंडू सपकाळे हे मनसेकडून, तर नगरसेवक दिलीप बाविस्कर अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. खेडीतील सद्गुरू एज्युकेशनच्या विद्यालयाजवळ मिलिंद सपकाळे यांच्या बूथजवळ बाविस्कर व सपकाळे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर वाद वाढला व दगडफेक झाली. त्यात दिलीप बाविस्कर यांचे वडील प्रल्हाद बाविस्कर (75), नगरसेवक दिलीप बाविस्कर, पालिकेचे कनिष्ठ अभियंता विजय मराठे व त्यांचे लहान भाऊ सचिन मराठे (31) हे चौघे जखमी झाले. घटनास्थळी पोलिस निरीक्षक दिलीप पगारे यांच्यासह पोलिस पथकाने दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत दोघांपैकी एकाही गटाने पोलिसांत तक्रार दाखल केलेली नव्हती.