आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन महिन्यांपासून व्यवसाय बंद; तणावात हाॅकर्सचा मृत्यू,अतिक्रमण काढल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शिवाजी राेडवरील हाॅकर्सचे अतिक्रमण काढल्यानंतर पर्यायी जागा उपलब्ध झाल्याने तीन महिन्यांपासून बऱ्याच विक्रेत्यांचा व्यवसाय बंद अाहेत. अनेक वर्षांपासून सुरू असलेला व्यवसाय अचानक बंद पडल्याच्या तणावात दीड महिन्यापूर्वी वृद्ध वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर मंगळवारी पहाटे कुटुंबाचे भवितव्य काय असेल, या विवंचनेत ४५ वर्षीय मुलाचाही दुर्दैवी अंत झाल्याची घटना शनिपेठेत घडली. दरम्यान, तणावामुळे अातापर्यंत १० जणांचा मृत्यू झाल्याचा दावा शिवाजीनगर हाॅकर्स असाेसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र वाणी यांनी केला अाहे.

पांडुरंग दामू वाणी (६०) गजेंद्र पांडुरंग वाणी (वय ४५) असे मृत पिता-पुत्राचे नाव अाहे. ते गेल्या ३० वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून शिवाजी राेडवर गूळविक्रीचा व्यवसाय करायचे. परंपरागत चालत अालेल्या व्यवसायामुळे वाणी कुटुंब गुण्यागाेविंदाने राहत हाेते. पांडुरंग वाणी यांचा मुलगा गजेंद्र याने याच व्यवसायाच्या जाेरावर मुलीचे लग्न केले, त्यानंतर माेठ्या मुलाला अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी नाशिकला पाठवले. परंतु, तीन महिन्यांपूर्वी मार्च राेजी या वाणी कुटुंबाच्या जीवनात अतिक्रमण हटावची त्सुनामी अाली अाणि त्यांचे हाेत्याचे नव्हते झाले. वडिलाेपार्जित व्यवसाय अचानक बंद पडल्याने तसेच नवीन जागाही मिळाल्याच्या विवंचनेत गेल्या दीड महिन्यापूर्वी पांडुरंग वाणी यांचे अचानक निधन झाले. या दु:खातून सावरत नाही, ताेपर्यंत पुन्हा नवीन धक्का वाणी कुटुंबाला सहन करावा लागला. मुलांचे शिक्षण, मुलीच्या लग्नासाठी काढलेले कर्ज कुटुंब खर्च कसा भागवायचा? या विचारात असलेल्या गजेंद्र वाणी यांना गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तणाव हाेता. याच तणावात गजेंद्रला साेमवारच्या मध्यरात्री वाजता अस्वस्थ वाटायला लागले. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. तातडीच्या उपचारानंतरही गजेंद्र यांची मंगळवारी सकाळी ७.४५ वाजता प्राणज्याेत मालवली. या घटनेची माहिती कळल्यानंतर हॉकर्सने वाणी यांच्या घरी गर्दी केली हाेती.

कर्तव्य नियमांचे अाम्ही बांधील अाहाेत
^हाॅकर्सच्यामृत्यूच्याघटनेबद्दल अाम्हालाही दु:ख अाहे. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश शासनाच्या अादेशामुळे कर्तव्य नियमांचे अाम्ही बांधील अाहाेत. कुणावरही अन्याय करण्याची प्रशासनाची भूमिका नाही. स्थलांतर करण्यापूर्वी हाॅकर्सला पर्यायी जागा दिलेली अाहे. त्यामुळे व्यवसाय करण्यास काेणालाही अडचण नाही. प्रदीप जगताप, उपायुक्त,मनपा

अतिक्रमण काढले, अाता पर्यायी जागेची व्यवस्था करा
सर्वाेच्चन्यायालयाने रस्त्यावरचे अतिक्रमण काढायला सांगितले अाहे. पालिका प्रशासनदेखील रस्ते फुटपाथवरील अतिक्रमण काढत अाहे. प्रशासनाने हाॅकर्सचे अतिक्रमण काढल्यानंतर त्यांच्या उपजीविकेसाठी पर्यायी जागेची व्यवस्था करून देणे गरजेचे अाहे. गजेंद्र वाणी यांच्याप्रमाणेच जाेशी पेठेतील पद‌्माकर वाणी यांच्या कुटुंबाचीही अशीच अवस्था असल्याचे हाॅकर्सने सांगितले. तीन महिन्यांपासून कुणालाही काम नाही, त्यामुळे घर कसे चालवायचे? हा प्रश्न असल्याचे मत मांडले.

याला मनपा जबाबदार
मनपा,पाेलिस जिल्हाधिकारी प्रशासनाकडून चार महिन्यांपासून हाॅकर्सला त्रास देणे सुरू अाहे. जागेवरून उठवले जाते, परंतु पर्यायी व्यवस्था केली जात नाही. अातापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला अाहे. राजेंद्रवाणी, अध्यक्ष,शिवाजीनगर हाॅकर्स असाेसिएशन
बातम्या आणखी आहेत...