आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवार्ता : सुरक्षारक्षकाचे हातपाय बांधून अडीच लाख लुटले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: दरोडेखोरांनी फोडलेली तिजोरी
धरणगाव - येथील एस.के.कॉटन इंडस्ट्री या जिनिंगमधून दरोडेखोरांनी अडीच लाखांची रोकड सोमवारी लुटून नेली. सुरक्षारक्षकाचे हातपाय बांधून बंदुकीचा धाक दाखवून चोरी करून दरोडेखोर प्रसार झाले.
चार दरोडेखोर बुरखा हातात हातमोजे घालून पहाटे चार वाजेच्या दरम्यान जिनिंगमध्ये शिरले. जिनिंग कार्यालयाच्या वऱ्हांड्यात सुरक्षारक्षक गणेश वाघमारे ग्रेडर रणजित चेची हे झोपलेले होते. दरोडेखोरांनी दोघांना चाकू बंदुकीचा धाक दाखवत त्यांचे हातपाय बांधले. अवघ्या पाच मिनिटांत त्यांनी ड्रॉवर तिजोरी तोडून अडीच लाखांची रोकड घेऊन पोबारा केला. दरोडेखोरांनी श्री स्वामी समर्थ जिनिंगजवळ उभ्या केलेल्या पांढऱ्या रंगाच्या मारुती- ८०० कारने धरणगावच्या दिशेने पळाले.

दरोडेखोर मराठीतच बोलत होते. त्यांनी सुरक्षारक्षकांना ‘ओरडल्यास ठार मारू’ अशी धमकी दिली. दरोडेखोरांनी सुरक्षारक्षकाला बांधल्यावर थेट रोकड असलेल्या खोलीत प्रवेश करून तिजोरी फोडली. यावरून त्यांना रोकड कोणत्या खोलीत ठेवली याची पूर्वकल्पना असल्याची शक्यता आहे.

पोलिस उपधीक्षक सदाशिव वाघमारे सहायक पोलिस निरीक्षक गणेश कदम यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच डीवायएसपी वाघमारे दिवसभर तळ ठोकून होते. याप्रकरणी सुरक्षारक्षक गणेश रघुनाथ वाघमारे यांच्या फिर्यादीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश कदम करीत आहेत.

कारचा शोध सुरू
मागीलमहिन्यात शहरातील छत्रपती शिवाजी कॉम्प्लेक्समधील जी.एस.ग्रुपचे कार्यालय काही चोरट्यांनी फोडले होते. त्या वेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एका चोरट्याचा अर्धवट चेहरा आला होता. याच चोरट्यांनी हा दरोडा घातल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. एलसीबीचे पथक स्थानिक पोलिसांनी पांढऱ्या रंगाच्या मारुती- ८०० कारचा शोध सुरू केला आहे.
बातम्या आणखी आहेत...