आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दागिना कॉर्नरमधून चोरलेले दोन लाखांचे दागिने हस्तगत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सराफाबाजारातील दागिना काॅर्नर या दुकानातून जूनला मुंबई क्राइम ब्रंॅचचा पाेलिस अधिकारी असल्याचे सांगून एका ताेतया पाेलिस अधिकाऱ्याने दाेन लाखांचे दागिने लुटून नेले हाेते. मंगळवारी त्याला शनिपेठ पाेलिसांनी खडकी पाेलिसांकडून ताब्यात घेतले हाेते.
त्याच्याकडून पाेलिसांनी दागिना कार्नरमधून चाेरलेल्या ९१ ग्रॅम २७० मिलीग्रॅम वजनाच्या लाख हजार १८५ रुयपे किमतीच्या तीन साेनसाखळ्या अाणि तीन नेकलेस ताब्यात घेतले.
खडकी पाेलिसांनी अटक केलेल्या रवींद्र महादू पवार (रा.माेंढाळे, ता.पाचाेरा, ह.मु.सुरत) याने राज्यभरात ताेतया पाेलिस अधिकारी बनून अनेक ठिकाणी साेन्याच्या व्यापाऱ्यांना ठगवल्याची माहिती पाेलिसांना मिळाली अाहे. प्रत्येक चाेरीत ताे एकच पद्धत वापरत हाेता. मात्र, पुण्यातील खडकी पाेलिस ठाण्याच्या हद्दीत त्याने केलेल्या चाेरीत ताे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्यामुळे पाेलिसांनी त्याच्या मुसक्या अावळल्या. रवींद्रने मुंबई, नाशिक, सुरत अाणि जळगाव जिल्ह्यातून महागड्या गाड्या चाेरल्या. त्या गाड्यांवर बनावट क्रमांक टाकून ताे चाेऱ्या करीत असल्याची कबुलीही त्याने पाेलिसांना दिली अाहे.

दागिना काॅर्नरच्या चाेरीत त्याने पुण्याहून चाेरलेली गाडी वापरल्याचा संशय पाेलिसांना अाहे. मूळचा पाचाेरा तालुक्यातील माेंढाळे येथील रवींद्र हा सध्या सुरतमधील नंदिनी हाैसिंग साेसायटीत भाड्याच्या घरात राहताे. तसेच माेंढाळे येथे त्याचे घर असून त्याचे चार भाऊही तेथे शेती करतात, अशी माहिती शनिपेठ पाेलिस ठाण्याचे निरीक्षक अात्माराम प्रधान यांनी दिली दिली.
न्यायालयात केले हजर
शनिपेठपोिलसांनी रवींद्र महादू पवार याला अटक केल्यानंतर बुधवारी न्यायाधीश अार. बी. ठाकूर यांच्या न्यायालयात हजर केले होते. त्यांनी चार दिवसांची पोलिस काेठडी सुनावली अाहे. सरकार पक्षातर्फे अॅड. एम. एस. फुलपगारे, तर अाराेपीतर्फे अॅड. विजय दर्जी यांनी काम पाहिले.
तोतया पोलिसाकडून जप्त करण्यात आलेले दागिने.