आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरदुपारी पावणेदाेन लाख लांबवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - कांचननगरातीलमहापालिकेच्या कर्मचाऱ्याला सोमवारी दुपारी ३.३० वाजता फोनवरून एका भामट्याने बँकेचे एटीएम ब्लॉक होण्याची भीती दाखवून पासवर्ड विचारला होता. त्याने पासवर्ड सांगितल्यानंतर २० मिनिटांच्या आत त्यांच्या बँक खात्यातून १५ हजार रुपये काढण्यात आले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कांचननगरातील हिरालाल पुंडलीक पाटील यांच्यावर मुंबई टाटा मेमाेरिअल हॉस्पिटलमध्ये कर्करोगावर उपचार सुरू आहेत. सोमवारी दुपारी ३.३० वाजता त्यांच्या मोबाइलवर एका भामट्याने फोन केला. या वेळी त्याने बँकेतून अविनाश चौधरी बोलतो असे सांगून तुमच्या एटीएमची मुदत संपली असून ते लवकरच ब्लॉक होणार आहे. त्यामुळे तुम्ही मला बँकेचा खाते क्रमांक आणि एटीएमचा पासवर्ड द्या, अशी मागणी केली होती. पाटील यांनी उपचारासाठी पैसे लागणार असल्याने एटीएम ब्लॉक होऊ नये म्हणून घाबरून एक्सिस बँकेचा खाते क्रमांक आणि पासवर्ड अविनाश चौधरीला सांगितला. त्यानंतर २० मिनिटांत त्या खात्यातून एकदा ९९९९ रुपये आणि दुसऱ्यांदा हजार रुपये, असे एकूण १४ हजार ९९९ रुपये त्यांच्या खात्यातून काढले. पैसा काढल्याचा एसएमएस पाटील यांचा मुलगा जयंत याच्या मोबाइलवर आला. त्यामुळे त्याने तत्काळ वडिलांना फोन लावून याबाबत विचारले. मात्र, त्यांनी पैसे काढले नसल्याचे सांिगतल्यावर बँकेला कळवून एटीएम ब्लॉक केले. त्यानंतरही पुन्हा एकदा हजार काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्ड ब्लॉक झाल्याने पैसे वाचले.
दुचाकीच्या डिक्कीतून ७० हजार चाेरले
बेंडाळेनगरातीलबाळू भास्कर पाटील (वय ४८) हे साेमवारी दुपारी १२.१५ वाजता िवसनजीनगरातील बँक अाॅफ बडाेद्यात अाले हाेते. त्यांनी त्यांची माेटारसायकल दीप मेडिकल स्टाेअर्सच्या बाजूला लावली हाेती. तसेच या माेटारसायकलच्या िडक्कीत एका तपकिरी रंगाच्या बॅगमध्ये ७० हजार रुपये ठेवलेले हाेते. पाटील हे खरेदीसाठी जवळच्या दुकानात गेले असता, अज्ञात चाेरट्याने िडक्की ताेडून ७० हजार रुपये लंपास केले. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पाेलिस ठाण्यात चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.
केळीव्यापाऱ्याच्या मुलाचे लाख चोरी
रवंजे(ता.एरंडाेल) येथील केळी व्यापारी मुख्तार सत्तार बागवान यांचा मुलगा महंमद शाेएब मुख्तार बागवान (वय १९) हा केळीचे पैसे घेण्यासाठी साेमवारी जळगाव येथे आला होता. त्याने दुपारी वाजेच्या सुमारास बी.जे.मार्केटमधील प्रकाश कांतीलाल यांच्याकडून लाख रुपये घेतले. त्यानंतर तो बसस्थानकावर येऊन जळगाव-रवंजे बसमध्ये बसला. मात्र, बस पंक्चर असल्याने तिला डेपाेत पाठवले गेले. त्यानंतर रवंजेसाठी दुसरी बस लावण्यात अाली. त्यामुळे पहिल्या गाडीतून उतरत असताना चोरट्याने त्याच्या बॅगला ब्लेडने कापून लाख रुपये लांबवले. दुसऱ्या बसमध्ये चढताना बॅग हलकी का लागतेय म्हणून त्याने ती उघडून बघितल्यावर बॅगमधील पैसे गायब झाल्याचे लक्षात आले. त्याने याप्रकरणी िजल्हापेठ पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.

दोन ठिकाणी वर्ग केले पैसे
पाटीलयांच्या एक्सिस बँकेच्या खात्यातून काढलेले पैसे चोरट्याने दोन कंपन्यांना वर्ग केले. त्यात हजार ९९९ रुपये मोबिविक या वेबसाइटवर खरेदी करून वर्ग केले. तर मुंबई येथील व्होडाफोन कंपनीत मोबाइलचे हजार रुपयांचे बिल भरले. बँकेच्या खात्यात एकूण ६५ हजार रुपये होते. मात्र, सुदैवाने वेळीच लक्षात आल्याने ते वाचले.
बातम्या आणखी आहेत...