आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहरातील मुल्ला कॉलनीतून दोघे बेपत्ता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- येथील मुल्ला कॉलनीत घडलेल्या वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये तरुण, तरुणी बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या पालकांनी याबाबत आझादनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

मुल्ला कॉलनीतील अब्दुलखान रहेमतुल्ला (२२) हा तरुण काल बुधवारी सायंकाळी सात वाजेपासून बेपत्ता झाला आहे. कोणास काही सांगता तो घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर मात्र तो परत आला नाही. तसेच सर्वत्र शोध घेऊनही त्याचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे त्याचे वडील रहेमतुल्ला हाजी अब्दुल लतीफ यांनी दिलेल्या माहितीवरून हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

अन्य एका घटनेत याच परिसरात राहणारी उझमाबी अब्दुल रज्जाक मुल्ला (१९) ही तरुणी बेपत्ता झाली आहे. याबाबत जमील अहमद अमिर अब्दुल मुल्ला यांच्या माहितीवरून हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. या दोन्ही घटनेचा तपास उपनिरीक्षक तडवी हे करीत आहेत.
बातम्या आणखी आहेत...