आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन चंद्र दिसण्याची अफवाच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मंगळ ग्रह जुलै रोजी पृथ्वीच्या अगदी जवळ पोहाेचेल तो चंद्राएवढा दिसेल, अशा प्रकारचे मेसेज गेल्या आठ दिवसांपासून व्हाॅट्सअॅपच्या विविध ग्रुपवरून झळकत आहेत. मात्र, ही केवळ अफवा असल्याचे खगोलशास्त्राच्या अभ्यासकांचे म्हणणे आहे.
मंगळ हा ग्रह पृथ्वीपासून सुमारे कोटी किलोमीटर अंतरावर आहे, तर चंद्र सुमारे ३५ लाख किलोमीटरवर आहे. त्या मानाने चंद्र पृथ्वीपासून खूप जवळ असल्यामुळे पृथ्वीवरून मोठा दिसतो. इतर ग्रह मात्र जास्त अंतरावर असल्यामुळे त्यांचा आकार कमी दिसतो. मात्र, व्हाॅट्सअॅपच्या विविध ग्रुपवर यासंदर्भात खोटी माहिती पसरवली जात आहे. त्यामुळे जुलैच्या रात्री आकाशात दोन चंद्र दिसतील, असा अनेकांचा गैरसमज झाला आहे. प्रत्यक्षात ही केवळ अफवा असल्याचे मत खगोलतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका
मंगळ ग्रह आणि पृथ्वीतील अंतर खूप जास्त आहे. परिणामी, मंगळ हा पृथ्वीच्या अगदी जवळ येऊन चंद्राप्रमाणे दिसेल, अशी शक्यताही व्यक्त करता येत नाही. त्यामुळे सोशल मीडियातून पसरवली जाणारी माहिती खोटी असून, त्यावर विश्वास ठेवू नये. -मोहन कुळकर्णी, खगोलअभ्यासक
सूर्याचे आयुष्य १० अब्ज वर्षे
सूर्याचेवय निश्चित करणारे पहिले वैज्ञानिक सर आॅर्थर एडिंग्टन हे आहेत. सूर्याचे एकूण आयुष्य १० अब्ज वर्षे आहे. अब्ज वर्षे संपली असून, आणखी अब्ज वर्षांनी सूर्याचा मृत्यू श्वेत बटू ताऱ्यामध्ये होईल. तसेच सूर्यावरून कधी कधी चंुबकीय लहरी फेकल्या जातात. त्यामुळे चुंबकीय वादळे येतात. सन १८५९मध्ये हे वादळ आल्याने जगातील टेलिग्राफ यंत्रणा बंद पडली होती. या वादळाला ‘केरिंग्टन इव्हेंट’ हे नाव दिले होते. या वादळामुळे सॅटेलाइट जीपीएस यंत्रणा पूर्णपणे बंद पडत असल्याचे खगोलतज्ज्ञांचे मत आहे.

सूर्य पृथ्वीचे अंतर वाढले
मंगळग्रहाबाबतची माहिती खोटी असली तरी, शनिवारी पृथ्वी आणि सूर्यातील अंतर सर्वाधिक होते. दरवर्षी जुलै रोजी ही घटना घडते. या घटनेला खगोलशास्त्रात एपिहेलिऑन (अपसूर्य) असे म्हणतात. पृथ्वी सूर्यामधील अंतर सरासरी १५ कोटी किलोमीटर आहे. मात्र, जुलै रोजी पृथ्वी सूर्यातील अंतर सरासरी १५२ दशलक्ष किलोमीटर राहणार आहे. पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा लंबवर्तुळाकार असल्याने अशी घटना घडत असते.