आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिरपूर येथे मध्यप्रदेश सीमेलगत 54 लाखांचे विदेशी मद्य जप्त, दोन अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- शिरपूर तालुक्यातील हाडाखेड गावाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धुळे येथील पथकाने छापा टाकून 53 लाख 84 हजार रुपये किमतीचे विदेशी मद्य जप्त केले. आज (शनिवारी) दुपारी ही कारवाई करण्यात आली.

मध्यप्रदेशात निर्मिती करण्यात आलेले हे मद्य एका ट्रकने महाराष्ट्रात विक्रीसाठी आणले जात होते. पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई केली. मद्याचे 1050 बॉक्ससह ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे. चालक अन्सार खान, शाकीर पटेल या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा या कारवाईचे फोटो आणि व्हिडिओ..
बातम्या आणखी आहेत...