आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळ्यातील जयहिंद चाैकात दाेघांना मारहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - मराठा माेर्चानंतर सायंकाळी जयहिंद चाैकात दाेन तरुणांना मारहाण झाली. याप्रकरणी दाेषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी जयहिंद चाैकात ठिय्या देऊन बसलेल्या जमावावर सुरक्षा पथकातील काही कर्मचाऱ्यांनी अचानक लाठीमार केला. त्यामुळे जयहिंद चाैकात जवळपास दाेन तास तणाव निर्माण झाला हाेता. याप्रकरणी देवपूर पाेलिस ठाण्यात रात्रीपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू हाेते.

शहरात बुधवारी मराठा माेर्चा काढण्यात अाला. त्यानंतर सायंकाळी जयहिंद चाैकात हर्षल परदेशी हा तरुण साेशल मीडियावर क्लिपिंग टाकत असताना त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही जणांकडून त्याला मारहाण करण्यात अाली. या वेळी घनश्याम पाटील हा शूटिंग करीत असताना त्याला मारहाण करण्यात अाली. याची माहिती मिळताच चाैकात शंभर ते दीड तरुणांचा जमाव जमला. त्यांनी चाैकातच ठिय्या अांदाेलन सुरू केले. त्या ठिकाणी अॅड. श्यामकांत पाटील, मनाेज माेरे, कमलेश देवरे यांच्यासह इतर काही राजकीय पदाधिकारी अाले. त्यांनी जमावाला समजविण्याचा प्रयत्न केला; परंतु जमाव एेकण्याच्या स्थितीत नव्हता. त्यामुळे नेतेही ठिय्या अांदाेलनात सहभागी झाले. घटनास्थळी पश्चिम देवपूरचे पाेलिसही अाले. त्यांनीही समजविण्याचा प्रयत्न केला. याची माहिती कळताच अजूनही काही तरुण चाैकात गाेळा झाल्याने तणाव वाढला. त्यामुळे देवपूर पाेलिसांनाही बाेलावण्यात अाले.
काही वेळाने डीवायएसपी हिंमत जाधव अाले. त्यांनीही जमावाला समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र हळहळू चाैकात गर्दी वाढल्याने तणाव वाढला. या वेळी देवपूर पाेलिसांत गुन्हा दाखल करण्याची सूचना डीवायएसपींनी केली. त्याबाबत चर्चा करीत असताना अचानक कमांडर पथकातील कर्मचाऱ्यांनी जयहिंद हायस्कूलकडून लाठीमार करायला सुरुवात केली. या घटनेमुळे ठिय्या अांदाेलन करणारे तरुण अाक्रमक झाले. त्यानीही कमांडर पथकाच्या कर्मचाऱ्यांकडे धाव घेतल्याने गाेंधळ उडाला. त्यात तणावात भर पडली. यानंतर अप्पर पाेलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी घटनास्थळी भेट देऊन समजूत घालीत कारवाई करण्याचे अाश्वासन देत मारहाणीबाबत पाेलिसांत गुन्हा दाखल करण्यास सांगितले. यानंतरही तणाव कायम हाेता. रात्री उशिराने तरुणाचा गट गुन्हा दाखल करण्यासाठी देवपूर पाेलिस ठाण्यात गेला हाेता.
बातम्या आणखी आहेत...