आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावातील दोन पोलिस निरीक्षकांची उचलबांगडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-जळगावजिल्ह्यातील सात पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. यात जळगाव शहरातील दोन, पाचोऱ्यातील एक, नियंत्रण कक्षातील तीन आणि चाळीसगावातील एक पोलिस निरीक्षकाचा समावेश आहे. जळगाव शहर आणि रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांची घरफोडींच्या पार्श्वभूमीवर उचलबांगडी करण्यात आली आहे.
जळगाव शहर पोलिस ठाण्याचे श्याम तरवाडकर यांना सिद्ध अपराध सेल येथे बदली दिली असून त्यांच्या जागी चाळीसगाव पोलिस ठाण्याचे किसनराव नजन पाटील यांची नियुक्ती झाली आहे. रामानंदनगर पोलिस ठाण्याचे सूर्यकांत पाटील यांना नियंत्रण कक्षात पाठवले आहे, तर त्यांच्या जागी पोलिस नियंत्रण कक्षातील पोलिस निरीक्षक अशोक सादरे आले आहेत. संजय देशमुख यांना पुन्हा चाळीसगाव पोलिस ठाण्यात पाठवले असून पाचोऱ्याचे निरीक्षक कुबेर चवरे यांची वाहतूक शाखेला बदली झाली आहे. त्यांच्या जागी नियंत्रण कक्षातील आर.एम. गाडे यांना पाचोऱ्यात पाठवले या शिवाय ए.के. पाडळे यांना एरंडोल पोलिस ठाणे, चंद्रकांत सरोदे यांना वाहतूक शाखा तर ए.पी. सोनवणे यांची आर्थिक गुन्हे शाखेत वर्णी लागली आहे. तसेच वाहतूक शाखेत असलेले डी.एस. शिंगारे यांना पुन्हा पोलिस कल्याण विभागाच्या निरीक्षकपदी पाठवले आहे. पोलिस उप निरीक्षकांच्याही बदल्या झाल्या. यात व्ही.पी. साळुंखे यांना जिल्हापेठ, गणेश कदम यांना पहूर तर समाधान मगर यांना अमळनेर पोलिस ठाण्यात पाठवले आहे. या शिवाय तीन पोलिस उप निरीक्षकांच्याही बदल्या झाल्या आहेत. यात जिल्हापेठचे बारकू जाणे यांची जामनेर, हेमंत कडुकार यांची भुसावळ तालुका तर आर.एन. शेख यांची कासोदा येथे बदली झाली. लाच प्रकरणात रंगेहाथ अटक झालेले चाळीसगाव पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक कैलास खांबट आणि हवालदार राजेंद्र राठोड यांना अद्याप निलंबित करण्यात आलेले नाही. लाचलुचपत विभागाकडून संबंधितांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे डॉ. सुपेकर यांनी सांगितले.