आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाेरटा पळाल्याप्रकरणी दाेन कर्मचारी निलंबित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- विद्युत कॉलनीत चाेरी करणाऱ्या चाेरट्याला नागरिकांनी पकडून पाेलिसांच्या स्वाधीन केले हाेते. ताे चाेरटा रामानंदनगर पाेलिसांच्या तावडीतून पळून गेला हाेता. याप्रकरणी जिल्हा पाेलिस अधीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर यांनी दाेन कर्मचाऱ्यांना निलंबित केले अाहे.

शिव कॉलनीतील ज्ञानेश्वर पाटील, विवेक पाटील, विकास पवार, स्वप्निल भंगाळे यांनी विद्युत कॉलनीजवळील शीतल भोजनालयाच्या छतावर चाेरी करण्यासाठी चढलेल्या चाेरट्याला पकडून २९ जुलैला रात्री रामानंदनगर पाेलिसांच्या ताब्यात दिले हाेते. त्या वेळी पाेलिस ठाण्यात जितेंद्र सुरवाडे, तुषार वाघ हे कर्मचारी ड्युटीवर हाेते. याच दरम्यान रात्री उशिरा चाेरटा पळून जाण्यास यशस्वी झाला. याप्रकरणी अपर पाेलिस अधीक्षक माेक्षदा पाटील यांनी कारणे दाखवा नाेटीस बजावली हाेती. मात्र, त्यांचा खुलासा समाधानकारक वाटल्याने बुधवारी डाॅ. सुपेकर यांनी दाेघांना निलंबित केले अाहे.
बातम्या आणखी आहेत...