आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पळासखेडे येथे दाेन बहिणींचा बुडून मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - बाेदवड तालुक्यातील पळासखेडे येथील तलावात पाेहत असताना दाेन चुलत बहिणींचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना साेमवारी सकाळी १० वाजता घडली.  पळासखेडे व जलचक्र या गावांच्या मध्यभागी साठवण तलाव अाहे. धुणे धुण्यासाठी येथे महिलांची गर्दी असते.

साेमवारी सकाळी पळासखेडे येथील चार मुली धुणे धुण्यासाठी गेल्या हाेत्या. तलावातील पाणी पाहून त्यांना पाेहण्याचा माेह झाला. मात्र, पाण्याच्या खाेलीचा अंदाज न अाल्याने पल्लवी सुपडू सुरवाडे (वय १४) व अाम्रपाली सुभाष सुरवाडे (वय १२) या बहिणींचा बुडून मृत्यू झाला. इतर दाेन मुलींनी अारडाअाेरड केल्याने शेजारील नागरिकांनी धाव घेऊन त्यांना बाहेर काढले. मात्र, डाॅक्टरांनी या दाेघींनाही तपासून मृत घाेषित केले.
 
पल्लवी सुरवाडे व अाम्रपाली सुरवाडे या दाेन मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी बाेदवड ग्रामीण रुग्णालयात अाणण्यात अाले. मात्र, या दाेन्ही मुलींच्या वडिलांनी शवविच्छेदन न करण्याची विनंती केली. त्यांनी यासंदर्भात लेखी लिहून दिले. त्यानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात अाले, असे पाेलिस उपनिरीक्षक सिद्धार्थ खरे यांनी सांगितले.
 
बातम्या आणखी आहेत...