आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two States Top Fashion Issue At Jalgaon Divya Marathi

टू स्टेट्स’ चित्रपटातील कुर्तीला तरुणींची पसंती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘टू स्टेट्स’ या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्टने घातलेल्या सिल्कच्या कुर्तीला बाजारात डिमांड वाढली आहे. चित्रपटात या कुर्तीसोबतच शिफॉन ओढणीचे कॉम्बिनेशनही दाखवले आहे. याच प्रकारच्या कॉम्बिनेशनला सध्या पसंती दिली जात आहे.

सिल्कचे कापड आता फक्त विशिष्ट ऋतूपुरतेच र्मयादित राहिले नसून, कोणत्याही सीझनमध्ये वापरले जाणारे हे मटेरियल बनले आहे. सिल्कची समर-फ्रेंडली व्हरायटी सध्या बाजारात पाहायला मिळत असून, हस्तनिर्मित सिल्कचे अनेक ड्रेसेसही उपलब्ध आहेत.

इंडो-वेस्टर्न लूकसाठी खासकरून याचा उपयोग केला जातो. या सीझनमध्ये सिल्कच्या पंजाबी ड्रेसवर एम्ब्रॉयडरी व थ्रेड वर्कच्या डिझायनर ड्रेसेसना अधिक मागणी आहे. वारासिवनी सिल्क उन्हाळ्यासाठी थंड मानले जाते. तसेच सॉफ्ट मलबारी सिल्कसुद्धा कुर्ती बनवण्यासाठी पसंत केले जाते.

ओढणीतही सिल्क
कुर्ती आणि पंजाबी ड्रेसव्यतिरिक्त सिल्कच्या प्रिंटेड ओढण्याही सध्या प्रचलित होत आहेत. याला प्लेन कुर्ती-पायजमायासोबत अधिक पसंत केले जात आहे. ड्रेसेसचा सॉफ्ट कलर आणि ओढण्यांचा ब्राइट कलर यात वापरण्यात येतो. त्यामुळे याचे कॉम्बिनेशन अधिकच खुलून दिसते.

सिल्क जॅकेटचीही क्रेझ
सिल्कच्या या वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये सिल्क जॅकेटची निराळीच क्रेझ आहे. सध्या साडी, पंजाबी व अनारकली ड्रेसवर विविध प्रकारचे जॅकेट्स घालण्याचा ट्रेंड आला आहे. घागरा- ओढणीसोबतही हे सिल्कचे जॅकेट वापरले जात आहे. रॉयल लूकसाठी कोणत्याही ड्रेससोबत सिल्कचा वापर करून फॅशन अपग्रेड करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे टसर सिल्क प्रिंट्सही पाहायला मिळत आहेत. त्यात गुजरातचे अजरक, राजस्थानचे सांगानेर आणि डाबू प्रिंट्सदेखील पाहायला मिळत आहेत.

मिक्स मॅचसाठी अँरी सिल्क
सिल्कच्या फॅशनमध्ये मिक्स मॅच कॉम्बिनेशन-साठी अँरी सिल्कचा वापर केला जात आहे. प्लेन आणि सॉफ्ट फॅब्रिकमध्ये हे सिल्क पाहायला मिळते. या मटेरियलसोबत एम्ब्रॉयडरी असलेल्या काथा, भागलपुरी, सिल्कच्या ओढण्यांसोबत चंदेरी आणि माहेश्वरी फॅब्रिक मॅच केले जात आहे.