आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅगिंगला कंटाळून मिलिटरी स्कूलचे २ विद्यार्थी पळाले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - भुसावळ येथील बियाणी मिलिटरी स्कूलच्या वसतिगृहात हाेत असलेल्या रॅगिंगला कंटाळून इयत्ता नववीतील दाेन विद्यार्थी साेमवारी सकाळी शाळेतून बाहेर पडले. ते बसमध्ये बसून थेट जळगावकडे निघाले. रडत असलेल्या या विद्यार्थ्यांची काही प्रवाशांनी चाैकशी करून त्यांना अजिंठा चाैफुलीवर वाहतूक पाेलिस कर्मचाऱ्याच्या ताब्यात दिले. पाेलिसांनी दाेन्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले.

साेमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास भुसावळ-जळगाव बसमध्ये बनियान घातलेले दाेन मुले रडत बसली हाेती. बसमधील प्रवाशांनी विचारपूस केली मात्र त्यांनी काहीच सांगितले नाही. त्यामुळे बस अजिंठा चाैफुलीवर पाेहाेचल्यानंतर प्रवाशांनी दाेन्ही मुलांना वाहतूक पाेलिस कर्मचारी नितीन ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मुलांची विचारपूस केली. त्या वेळी ती दाेन्ही भुसावळ येथील बियाणी मिलिटरी स्कूलमधील ९ वीच्या वर्गात शिकत असल्याचे सांगितले.‘वसतिगृहातील माेठी मुले दरराेज मारहाण करतात. शाळेच्या शिक्षकांना सांगितले तर अाणखीन मारहाण करण्याची धमकी देतात. दरराेजच्या मारहाणीला कंटाळून शाळेतून अाम्ही निघून अालाे,’ असे त्यांनी पाेलिसांना सांगितले.

यापैकी एक विद्यार्थी चाळीसगावचा तर दुसरा दुसरा सिल्लाेड येथील व्यापाऱ्याचा मुलगा अाहे. वसतिगृहातील मुले दरराेज रात्री ११ वाजले की, अंगावर चादर टाकून मारत असल्याचे त्यांचे म्हणणे अाहे. राेजच्या या मारहाणीला कंटाळून निघून अाल्याचे त्यांनी पाेलिसांना सांगितले. एमअायडीसी पाेलिसांनी या दाेन्ही विद्यार्थ्यांच्या पालकांना बाेलावले. दुपारी ३ वाजेच्या सुमारास पालक अाले. त्यांनी शाळेकडे तक्रार द्यायची असल्याचे सांगून पाेलिसात तक्रार देण्यास नकार दिला. एमअायडीसी पाेलिसांनी दाेन्ही विद्यार्थ्यांकडून लेखी घेतल्यानंतर ४ वाजता त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.
बातम्या आणखी आहेत...