आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेनसाखळीचाेरांना लावणार माेक्का

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरात साेनसाखळीचाेरीच्या घटना नित्याच्याच झाल्या अाहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला शनिवारी बाेदवड येथे वृद्ध महिलेची साेनसाखळी लांबवताना दाेघा चाेरट्यांना अटक करण्यात यश अाले अाहे. या चाेरट्यांची चाैकशी करून त्यांच्या टाेळीचा छडा लावून त्यांच्यावर माेक्का लावणार असल्याचे जिल्हा पाेलिस अधीक्षक डाॅ.जालिंदर सुपेकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले.
साेनसाखळी लांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सादिक अली इबादत अली, शेरू सल्तनत इराणी (दोघे रा.भुसावळ) यांना एलसीबीच्या पथकाने पकडले हाेते. या तरुणांनी शुक्रवारी प्रेमनगरात लीलाबाई भुतडा (वय ६८) यांची साेनसाखळी लांबवल्याची कबुली दिली अाहे. त्यांनी राज्यातील अनेक ठिकाणी चाेऱ्या केल्याची शक्यता पाेलिसांनी वर्तवली अाहे.

रेकाॅर्डतयार करून माेक्का लावणार
साेनसाखळीचाेरट्यांना चाप बसण्यासाठी त्यांचे रेकाॅर्ड तयार करून त्यांच्यावर माेक्का कायद्याखाली कारवाई करणार. स्थानिक गुन्हे शाखेतील जुन्या अाणि नवीन कर्मचाऱ्यांचे पथक तयार करणार अाहे. त्यासाठी लवकरच बैठक घेऊन कार्यवाही करणार असल्याचे सुपेकर यांनी सांगितले.

अायजींनीकेले अभिनंदन : बाेदवडयेथे एलसीबीचे रवींद्र पाटील रमेश चाैधरी यांनी दाेन साेनसाखळीचाेरांना अटक केली हाेती. त्यामुळे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पाेलिस महानिरीक्षक जयजीत सिंग यांनी डाॅ.सुपेकर यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले.
चाेरीसाठी माेटारसायकल घेत हाेते भाड्याने

सादिकशेरू यांनी साेनसाखळी चाेरण्यासाठी भुसावळ, जळगाव, खामगाव अकाेला येथून एक हजार रुपये राेजाने माेटारसायकल भाड्याने घेत असल्याची कबुली िदली अाहे. शनिवारी देखील त्यांनी बाेदवड येथे चाेरी करण्यासाठी भुसावळ शहरातून बजाज पल्सर २२० (क्र.एमएच-३०-एसी-७९३९) ही गाडी एक हजार रुपये भाड्याने घेतली हाेती.