आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वेळा आंदोलन खपवून घेतले, तिसऱ्यांदा झाल्यास कडक कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अापल्या मागण्या सनदशीर पद्धतीने सांगण्याची अांदाेलन करण्याची मुभा आपल्याला घटनेने दिली आहे. त्यासाठी परवानगी घेऊन अांदाेलन केले पाहिजे. शहरात गेल्या अाठ दिवसांत दाेन वेळा विनापरवानगी अांदाेलने झाली. त्यामुळे अाता यापुढे काेणी विनापरवानगी अांदाेलन केले, तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल,असा इशारा जिल्हा पाेलिस अधीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर यांनी सोमवारी शांतता समितीच्या बैठकीत दिला.
अजिंठा चाैफुली गोलाणी मार्केटमध्ये झालेल्या ताेडफाेड अन् दंगलीच्या पार्श्वभूमीवर साेमवारी सकाळी ११ वाजता पाेलिस मुख्यालयातील मंगलम् सभागृहात मुस्लिम समुदायातील प्रतिष्ठीत नागरिक, माैलवी, मशिदीचे ट्रस्टी, मुस्लिम राजकीय नेते यांच्यासोबत शांतता समितीची बैठक घेण्यात अाली. या वेळी डाॅ. सुपेकर बाेलत हाेते. शुक्रवारी मशिदीमधून फतवा काढण्यात अाला. त्यामुळे काही वेळातच शेकडाे तरुणांचा जमाव जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी अाला. त्यानंतर जमावाने गाेलाणी मार्केटमध्ये जाऊन ताेडफाेड केेली. मशिदीमधून अशा पद्धतीने फतवा काढून अांदाेलन करणे चुकीचे असल्याचे डाॅ. सुपेकर यांंनी सांगितले. जमाव गाेळा करणे साेपे अाहे, मात्र त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण अाहे. अशा अवघड परिस्थितीत एखाद्यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्याची जबाबदारी काेण स्वीकारणार. त्यामुळे काेणतेही अांदाेलन करण्यासाठी पूर्वपरवानगीची गरज अाहे. तसेच या पुढे मशिदीमधून अशा पद्धतीने फतवा काढणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. शहरात काेणतेही अांदाेलन विनापरवानगी निघायला नकाे. अशांवर कारवाई करण्याचे अादेश सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले.
तरुणांनायाेग्य मार्गदर्शन करा
सर्वसमाजातील वरिष्ठांचे काम तरुणांना याेग्य मार्गदर्शन करणे असते. मात्र, ते हाेताना दिसत नाही. तरुणांना चिथावणी दिल्यामुळे दंगली झाल्या, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. भविष्यात या गुन्ह्यांमुळे त्यांना अडचणी येणार अाहेत. यापुढे अशा पद्धतीच्या घटना टाळण्यासाठी तरुणांना याेग्य मार्ग दाखवण्याचे अावाहन पाेलिस अधीक्षकांनी केले. जातीय तणावाबाबतीत जिल्ह्याचा इतिहास वाईट अाहे. मात्र, अाता हा वाईट इतिहास बदलण्याची गरज अाहे, त्यासाठी शहरात हाॅकर्स अतिक्रमणावरून किंवा किरकाेळ कारणावरून झालेल्या वादांना जातीय रंग दिला जाताे, त्यामुळे जातीय तणाव निर्माण हाेताे. ज्या पाेलिस ठाण्याच्या हद्दीत वाद झाला असेल, त्या पाेलिस ठाण्यात माेठा जमाव येताे. यानंतर पाेलिस ठाण्यात जमाव अाला, तर अगाेदर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा त्यानंतर पुढील कारवाई करण्याचे अादेश डाॅ. सुपेकर यांनी दिले. जर एखाद्या पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करीत नसतील, तर याप्रकरणी सरळ अपर पाेलिस अधीक्षक किंवा माझ्याकडे तक्रार केली तर चाैकशी करून तत्काळ गुन्हे दाखल करण्यात येतील. मात्र, त्यासाठी हिंसक मार्ग अवलंबणे चुकीचे अाहे. यासंदर्भात हिंदू संघटनांशीही चर्चा सुरू असून लवकरच त्यांचीही बैठक घेण्यात येणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...