आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे शहराजवळील अपघातात दोन ट्रकच्या केबिनचा झाला चक्काचूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई-आग्रा महामार्गावर अपघातानंतर रस्त्यावर पडलेले ड्रम. - Divya Marathi
मुंबई-आग्रा महामार्गावर अपघातानंतर रस्त्यावर पडलेले ड्रम.
धुळे- शहराजवळील वरखेडी फाट्याजवळ रविवारी दुपारी दोन ट्रक एकमेकांवर समोरासमोर धडकले. या अपघातात ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला. अपघातात दोन जण जखमी झाले. यापैकी एका जखमीवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली. 
 
शहराजळून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावर वरखेडी फाटा आहे. या फाट्यापासून काही अंतरावर ट्रकवर (एम एच १८/ एएन७४९१) समोरून येणारा अन्य एका ट्रक (एम एच १८/एए ०५९१)वर अादळला. दोन्ही वाहने एकाच दिशेने समोर आल्यामुळे हा अपघात झाला. अपघातात दोन्ही वाहनांमधील चालक संतोष महेंद्रसिंग राजपूत (२६, रा. देवझिनी कॉलनी, सेंधवा, मध्य प्रदेश) दिलीप वजीर पाटील (४०, रा. नगाव, ता. धुळे) हे जखमी झाले. दोन्ही ट्रकचे केबिन चेपले गेले. एका ट्रकमध्ये असलेले पत्र्याचे ड्रम रस्त्यावर येऊन पडले. अपघातानंतर काही वेळातच पोलिस पथक दाखल झाले.
 
तोपर्यंत महामार्गावर काहीअंशी वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. शिवाय क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला नेण्यात आली. दरम्यान, या अपघातातील जखमी दिलीप पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर संतोष राजपूत यांच्या माहितीवरून आझादनगर पोलिस ठाण्यात मोटार अपघात कायद्यानुसार या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...