आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकी झाडावर अादळून एक ठार, तर एक जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मित्राच्या भावाला मुलगी झाल्याच्या अानंदात हाॅटेलवरून जेवण करून रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या तरुणाची दुचाकी झाडावर अादळली. यात दुचाकीस्वाराच्या डाेक्याला जबर मार लागल्याने ताे जागीच ठार झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला अाहे. ही घटना बुधवारी मध्यरात्री १.४५ वाजता गाेविंदा रिक्षा स्टाॅपजवळ घडली.

सिंधी काॅलनीमधील संत कंवररामनगरातील सागर राेशन तलरेजा (वय ३०) याच्या भावाला मुलगी झाली. त्या अानंदात सागर बुधवारी मित्रांसाेबत हाॅटेलवर जेवणासाठी गेला हाेता. रात्री १.४५ वाजता जेवण अाटाेपल्यानंतर सागर हा त्याचा मित्र किशाेर माेहनलाल ललवाणी (वय २६) याच्या दुचाकीने (क्र. एमएच-१९-बीडब्ल्यू-१२१) पान खाण्यासाठी रेल्वेस्थानकाकडे जात हाेता. गाेविंदा रिक्षा स्टाॅपजवळून नेहरू पुतळ्याकडे जात असताना किशाेरचे नियंत्रण सुटले. त्यामुळे त्याची दुचाकी खान्देश सेंट्रल माॅलला लागून असलेल्या गेटच्या बाजूस असलेल्या सप्तपर्णीच्या झाडावर अादळली. याच वेळी रिक्षाचालक प्रदीप कासार हा रेल्वेस्थानकाकडे जात हाेता. त्याने रिक्षा थांबवून पाेलिसांना घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर शहर पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक नवलनाथ तांबे, अक्रम शेख, सुधीर साळवे हे घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी किशाेर सागर यांना रिक्षातून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. किशाेर याच्या डाेक्याच्या मागच्या बाजूला चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाल्याने अतिरक्तस्त्राव झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सागरला गंभीर दुखापत झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले अाहे. असे अापत्कालीन वैद्यकीय अधिकारी डाॅ. सुशांत सुपे यांनी सांगितले. याप्रकरणी शहर पाेलिस ठाण्यात अपघाताची अाकस्मात मृत्यूची नाेंद केली अाहे.

हेल्मेटने जीव वाचणे शक्य
किशाेर ललवाणी याने वाहन चालवताना हेल्मेट परिधान केलेले नव्हते. हेल्मेट घातले असते तर कदाचित त्याचे प्राण वाचले असते.

मृत्यूपूर्वी किशोरचे झाले अाईशी बाेलणे
किशाेर हा फुले मार्केटमध्ये एका दुकानावर कामाला हाेता. ताे बुधवारी घरी लवकर अाल्याने अाईने त्याचा शाेध घेतला. त्या वेळी ताे मित्रांसाेबत हाॅटेलवर जेवणासाठी गेल्याचे कळाले. त्यामुळे अाईने त्याला फाेन करून लवकर येण्याचे सांगितले हाेते. त्यानंतर काही वेळातच त्याच्या अपघाताची बातमी कळाल्याने किशाेरच्या अाईला धक्का बसला.

अपघातात दुचाकीचे झालेले नुकसान.
रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा : अपघातानंतरसर्वप्रथम रिक्षाचालक प्रदीप कासार घटनास्थळी पाेहोचला. त्याने किशाेर सागरला पाेलिसाच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्या वेळी किशाेर सागरच्या खिशात सहा ते सात हजार रुपये हाेते. महागडे माेबाइलही हाेते. रिक्षाचालकाने ते पाेलिसांकडे दिले.