आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्डा चुकवताना दुभाजकावर अादळल्याने दुचाकीस्वार ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - शहरातील पंधरा बंगला भागातून रेल्वे कंटेनरकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डा अन‌् मातीचा ढिगारा चुकवताना कंडारीचा युवक दुभाजकावर अादळला. डाेक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी ९.४५ वाजेच्या सुमारास घडली.


कंडारीचा किरण शिवाजी चाैधरी (वय २५) या युवकाच्या चुलत भावाचा साखरपुडा भुसावळ तालुक्यातील निंभाेरा येथे मंगळवारी हाेता. दुचाकीने (क्रमांक एमएच-१९ सीई-७९२५) अाईला कार्यक्रमस्थळी पाेहाेचवून ताे पुन्हा भुसावळात काही खासगी कामानिमित्ताने अाला. त्यानंतर सकाळी ९.४५ वाजता पुन्हा शहरातील पंधरा बंगल्यातून कंटेनरकडे जाणाऱ्या रस्त्याने निंभाेऱ्याकडे निघाला. मात्र, माउली ट्रेडर्ससमाेर रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी टाकलेला मातीचा ढिगारा खड्डा चुकवताना त्याची भरधाव दुचाकी दुभाजकावर अादळली. डाेक्याला मार लागून रक्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यू झाला.

बाजारपेठचे पाेलिस गेले धावून
अपघाताचीमाहिती मिळताच अवघ्या १० मिनिटांत बाजारपेठ पाेलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रामलाल साठे, डीबी पथकाचे कर्मचारी घटनास्थळी धावून गेले. मात्र, किरण चाैधरीच्या डाेक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याने त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात अाला. त्याच्या पश्चात अाई-वडील, एक बहीण असा परिवार अाहे. एकुलता एक मुलगा दुर्घटनेत गमावल्याने त्याच्या अाई-वडिलांनी अक्षरश: हंबरडा फाेडला. पाच वर्षांपासून रस्त्याची दुरुस्ती हाेत नसल्याने मृताच्या नातेवाइकांसह वाहनचालकांनी पालिकेवर संताप केला.

मृताच्या विराेधातच गुन्हा दाखल : रस्त्याच्यापरिस्थितीकडे दुर्लक्ष करून वेगात दुचाकी चालवली स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत झाला म्हणून मृत किरण चाैधरीवर बाजारपेठ पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला. शिवाजीनगरातील अाशिष दिलीप जाधव यांनी या संदर्भात फिर्याद दिली. पाेलिसांनी घटनास्थळावरून अपघातग्रस्त दुचाकी (एमएच-१९ सीई-७९२५) ताब्यात घेतली. उपनिरीक्षक रामलाल साठे हे घटनेचा पुढील तपास करीत अाहेत.

अपघातानंतर पालिकेला जाग : अपघातातकिरण चाैधरीचा बळी गेल्यानंतर पालिकेला जाग अाली. सकाळी ११ वाजेनंतर तातडीने रस्त्यावर पडलेले मुरुमाचे ढिगारे पसरवण्यात अाले. गेल्या वर्षीही याच ठिकाणी डीअारएम कार्यालयातील कार्यालय अधीक्षक सुरेश ठाकूर यांचा २५ मार्च २०१५ राेजी दुपारी एक वाजता कंटेनरने धडक दिल्याने मृत्यू झाला हाेता. शिवसेनेने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गेल्या दाेन वर्षांत तीन वेळा अांदाेलने केली; पण दुरूस्ती झालीच नाही.

रस्ता दुरुस्ती अाेबड-धाेबड : नगरपालिकाप्रशासनाने डाॅ. बाबासाहेब अांबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरवड्यात पंधरा बंगला ते हाॅटेल सायलीपर्यंतच्या रस्त्याची मुरूम माती टाकून दुरुस्ती केली अाहे. मात्र, ती अाेबड-धाेबड अाहे. अनेक ठिकाणी भररस्त्यावर मुरुमाचे ढिगारे पडलेले असल्याने अपघाताच्या घटना वाढल्या अाहेत. पालिकेच्या दिरंगाईने मंगळवारी कंडारीच्या युवकाला जीव गमवावा लागल्याने लाेकभावना तीव्र अाहेत.