आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रकच्या चाकाखाली अाल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, साकेगावात पसरली शाेककळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - ट्रकने कट मारल्याने चाकाखाली येऊन साकेगावच्या दुचाकीस्वार विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही दुर्घटना भुसावळ येथील जळगाव राेडवरील भाेईनगरसमाेर सकाळी ७.३० वाजता घडली. शेख समीर शेख कादीर (वय १५) असे मृताचे नाव अाहे.

साकेगाव येथील शेख समीर शेख कादीर हा इंदिरा गांधी विद्यालयात इयत्ता नववीत शिकताे. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थ घेण्यासाठी ताे अाशिष हिलाल भाेईटे या मित्रासाेबत दुचाकीवर(क्रमांक एमएच १९-बी-१७५३) मागे बसून भुसावळात अाला हाेता. घराकडे परत जात असताना त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने (क्रमांक जीजे २५-व्ही-८२७१) सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास भाेईनगरजवळ कट मारला. त्यात दुचाकीवरील समीर शेख हा भरधाव ट्रकच्या चाकाखाली अाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याचा साथीदार अाशिष भाेईटेच्या पायाला दुखापत झाली.

चालकाची पाेलिसांकडे धाव
दुचाकीस्वाराचामृत्यू झाल्याचे लक्षात येताच ट्रकचालक पद्मभाई नागाभाई कडसा (रा. पाेरबंदर, गुजरात) याने घटनास्थळावरून पळ काढून थेट शहर पाेलिस ठाणे गाठलेे. सहायक निरीक्षक अार.टी. साेनवणे, उपनिरीक्षक अार.एस.वसतकर पाेलिसांचे पथक घटनास्थळी धावले. संतप्त नागरिकांनी ट्रककडे धाव घेताच हा ट्रक तेथून हलवून डीवायएसपी कार्यालयाच्या अावारात अाणण्यात अाला. अपघातात साकेगाव येथील विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, विनाेद ठाकरे यांच्यासह ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळ गाठून मृताच्या नातेवाइकांना माहिती देण्याचा प्रयत्न केला. पाेलिसांनी रुग्णवाहिका बाेलवून समीरचा मृतदेह तातडीने पालिका रुग्णालयात नेला. त्यानंतर ताे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात अाला. रुग्णालयात परिसरातील नागरिकांनी माेठी गर्दी केली हाेती.
पुढे वाचा..
> शहर पाेलिसांत गुन्हा दाखल
> ईदची सामूहिक नमाज पठण नाही
> मित्राने घटनास्थळी फाेडला टाहाे
बातम्या आणखी आहेत...