आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्याध्यापकाचा मुलगा दुचाकी चोरण्यात पारंगत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरात दुचाकीचोरीचे प्रमाण वाढले असल्याने एलसीबीसह काही पोलिस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांनी पाच-सहा चोरांना अटक केली. तसेच मंगळवारी रात्री शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अन्य एका चोरट्यालाही चोरीच्या मोटारसायकलसह अटक केली. हा चोरटा अल्पवयीन असून, तो शहरातील मूजे महाविद्यालयात प्रथम वर्ष कला शाखेत शिकत असून मुख्याध्यापकाचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे.
सावित्रीनगर भागातील १७ वर्षीय मुलाने रविवारी बिग बझार येथून दिलीप मुरलीधर नारखेडे (रा.पार्वतीनगर) यांची दुचाकी (क्र.एमएच-१९-एक्स- १६३६) चोरली. त्यानंतर नारखेडे यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्याआधी दोन दिवस स्वतच शोधून नंतर गुन्हा दाखल करण्याच्या विचारात नारखेडे होते.
शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ख्वाजामियॉ रस्त्यावर नारखेडे यांच्या दुचाकीसह संबंधित चोरटा आढळून आला. त्यांनी पाठलाग करत असतानाच पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे शहर पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार नथ्थू साळुंके, प्रीतम पाटील, सुनील जाधव, मिलिंद सोनवणे, अमोल विसपुते, धनराज शिरसाठ, संजय शेलार, प्रदीप नन्नवरे आणि वासुदेव मराठे यांनी नारखेडेंनी दिलेल्या माहितीनुसार पाळत ठेवली व रात्री १० वाजेच्या सुमारास सापळा रचून घराजवळून ताब्यात घेतले. त्याच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सॅकमध्ये वाहनचोरी करण्याचे साहित्य
या चोरट्याचे वडील शहरातील एका शाळेत मुख्याध्यापक असून, तो मूजे महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. पोलिसांनी त्याच्या सॅकची झडती घेतली असता, त्यात दुचाकीच्या नंबरप्लेट व इतर नट उघडण्याचे साहित्य, बनावट कागदपत्रे तयार करण्याच्या साहित्यात व्हाइटनर, स्टॅम्पपॅड आदी वस्तू होत्या. चोरलेल्या दुचाकीची नंबरप्लेट बदलवून बनावट नंबरप्लेट बसवण्याचे उद्योगही तो करीत होता. त्यानंतर जी नंबरप्लेट बसवली त्याची बनावट कागदपत्रे तयार करू ते वाहन विक्री करण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या तासाभरात चार वाहने दिली काढूनअटक केल्यानंतर सुरुवातीला नकार देणाऱ्या या चोरट्याने पोलिसी खाक्या दाखवताच तासाभरात चार दुचाकी काढून दिल्या. या सर्व दुचाकी त्याने घराजवळील एका मोकळ्या जागेत उभ्या करून ठेवल्या होत्या. त्याच्याकडे आणखी काही दुचाकी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तसेच त्याच्यासोबत आणखी कुणी साथीदार आहेत काय? याचाही शोध पोलिस घेत आहेत.
बनावट चावीने चोरल्या गाड्या
चोरट्याकडून एक बनावट चावीही हस्तगत केली आहे. या चावीने तो ज्या दुचाकीचे इग्निशन स्विच खराब झाले आहे त्यांचे स्विच सुरू करून चोरी करीत होता. त्याच्याकडून एमएच- १९-एक्स-१६३६, एमएच-१०-एएस-११३०, एमएच-१९-एके-७२३२ आणि एमएच-१९-एसी-४४०७ या चार स्पेंडर दुचाकी जप्त केल्या असून, त्यांचे हे क्रमांक बनावट असण्याची शक्यता आहे.