आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकींच्या धडकेत आईच्या कुशीतील चिमुकला बचावला,

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्‍मक फोटो - Divya Marathi
प्रतिकात्‍मक फोटो
जळगाव; शहरपाेलिस ठाण्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमाेर रविवारी सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास दाेन दुचाकींची जाेरदार धडक झाली. यात दाेघे जखमी झाले असले तरी, या अपघातात आईच्या कुशीत असलेला दीड वर्षाच्या चिमुकल्यास सुदैवाने साधे खरचटलेही नाही.

नशिराबाद येथील वासुदेव मधुकर राेटे (वय २२) हा बहीण माधुरी राेटे अाणि दीड वर्षाचा भाच्यासाेबत हीराे-हाेंडा सीडी डाॅन (एमएच- १९, एडी- ३४५७)ने रविवारी सायंकाळी ५.४५ वाजता शहर पाेलिस ठाण्याकडून फुले मार्केटकडे रस्ता अाेलांडून जात हाेता. त्या वेळी टाॅवर चाैकाकडून घाणेकर चाैकाकडे फळविक्रेते शकील रहीम हे त्यांच्या हाेंडा युनिकाॅर्न (एमएच- १९, एके- २००६) जात हाेते. त्या वेळी दाेन्ही दुचाकींची धडक झाली. ही धडक इतकी जबर होती की माधुरी या हवेत फेकल्या गेल्या. त्यांच्या कुशीत दीड वर्षाचा मुलगाही हाेता. परंतु, सुदैवाने त्याला साधे खरचटलेही नाही. अपघातात शकील यांच्या पायाला तर माधुरी यांच्या हाताला दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...