आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकींचे पार्ट‌्स अदलाबदल करून विक्रीचा नवा गोरखधंदा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: चोरीच्या दुचाकींसह पोलिसांनी अटक केलेले संशयित आरोपी.
जळगाव - दुचाकी चोरीचा नवा फंडा अवलंबणाऱ्या एका टोळीला बुधवारी पहाटे रामानंदनगर पोलिसांनी अटक केली. पोलिसांच्या जाळ्यात अडकू नये म्हणून एकाच वेळी एकापेक्षा जास्त दुचाकी चोरून त्यांच्या स्पेअर पार्टची अदला-बदली करून विक्री करण्याची पद्धत होती. दरम्यान, हॅण्डल लाॅक नसलेल्या दुचाकी चाेरण्याचा मार्ग या चाेरट्यांनी अवलंबला हाेता.

रामानंदनगर पोलिसांनी मंगळवार बुधवारी कारवाई करीत समाधान कैलास कोळी (वय २१, रा. हरिओमनगर, जैनाबाद), कारागीर दगडू गुलाब पठाण, शकिल फतरू पटेल (रा.दोघे, म्हसावद) एका अल्पवयीन संशयिताला अटक केली आहे. त्यांच्याकडून चाेरीच्या तीन, माॅडिफाय केलेल्या दाेन दुचाकी माेकळे स्पेअर पार्ट पाेिलसांनी जप्त केले आहे. अल्पवयीन मुलगा कोळी हे दोघे चोरी करून पटेल पठाण यांना विकत होते. त्यानंतर हे मॅकेनिकल चोरीच्या दुचाकींचे पार्ट वेगवेगळे करून ते इतर दुचाकींना बसवून देत. त्यांच्या या नवीन पद्धतीमुळे चोरीच्या दुचाकी शोधणे अत्यंत कठीण झाले होते. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून रामानंदनगर पोलिसांनी कोळी अल्पवयीन मुलावर पाळत ठेवून प्रकार उघडकीस आणला आहे.

अल्पवयीन चोराचा हातखंडा
२८मार्च रोजी संभाजीनगर येथे सुरू असलेल्या एका बांधकामाच्या ठिकाणाहून असमल खान जाबज खान (रा.मेहरूण) यांची दुचाकी चोरीस गेली होती. चोरीनंतर असलम खान यांनी शेजारीच सुरू असलेल्या बांधकामावरील अल्पवयीन मजुरावर संशय व्यक्त केला होता. तेव्हापासून त्याच्यावर पोलिसांनी नजर ठेवली होती. खान यांचा संशय खरा ठरला होता. याच मुलाने २८ मार्च रोजी दुपारच्या वेळी दुचाकी चोरी करून ती समाधान कोळी याच्याकडे ठेवली होती. चोरी करून तो पुन्हा कामावर हजर झाला होता. दुचाकी चोरीस गेल्याचे लक्षात आल्यानंतर खान यांनी सायंकाळी त्या अल्पवयीन मुलावर संशय व्यक्त केला होता. त्याला हटकलेही होते. त्याच्यावर संशय बळावल्यामुळे खान यांनी पोलिसांना याची माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली. आठ-दहा दिवस हालचालींवर लक्ष ठेवल्यानंतर पोलिसांची खात्री झाली. त्यानंतर अल्पवयीन मुलास मंगळवारी ताब्यात घेतले.

नंतर झाली लपवालपवी
खानयांची दुचाकी चोरी केल्यानंतर पोलिसांनी त्या अल्पवयीन चोरट्यावर पाळत ठेवली होती. याची माहिती त्या चोरट्याला कळाली होती. त्याने तत्काळ कोळी यालाही माहिती दिली. तोपर्यंत कोळी याने ही दुचाकी म्हसावदच्या गॅरेजवर पोहोचवली नव्हती. मात्र, पोलिस मागावर असल्याची कुणकुण त्यांना लागल्यामुळे कोळी याने खान यांची दुचाकी कानळदा रोडवरील एका शेतात फेकून दिली हाेती. ती दुचाकीही हस्तगत करण्यात आली आहे. ज्या दुचाकींना हॅण्डल लॉक नसायचे अशाच दुचाकी चोरण्याचा प्रकार या टोळीने अवलंबला होता. चोरीच्या दुचाकी तत्काळ म्हसावदला पोहोचवून त्यांचे स्पेअर पार्ट मोकळे केल्यामुळे त्या दुचाकी शोधणे कठीण व्हायचे.
१४ जणांच्या पथकाची कारवाई
रामानंदनगरपोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक सादरे, पोलिस उपनिरीक्षक दिलीप पाटील, विजय निकुंभ, संभाजी पाटील, अनिल फेगडे, किरण पाटील, शैलेश चव्हाण, नीलेश सूर्यवंशी, हितेंद्र बागुल, सुनील पाटील, ज्ञानेश्वर वाघ, गोपाल बेलदार, विजयसिंग पाटील शशिकांत महाले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. बुधवारी तीनही संशयितांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली अाहे.

२० वर्षांपूर्वीच्या हीरो होंडा एसएसला मॅकव्हील
चोऱ्यालपवण्यासाठी चोरट्यांनी अफलातून पद्धत अवलंबली होती. सध्या बाजारात असलेल्या अत्याधुनिक बाइक त्यांनी चोरी केल्या असून ते त्यांचे स्पेअर पार्ट जुन्या गाड्यांना बसवत होते. जप्त केलेेल्या एका हीरो होंडा एसएस या २० वर्षांपूर्वी पासिंग झालेल्या दुचाकीला चक्क मॅकव्हील बसवलेले होते. त्यामुळे ही गाडी दिसताचक्षणी काहीतरी बदल झाल्याचे दिसून येत होते. एमएच १९ जी ९५८०, एमएच १९ आर २३६६ या दुचाकी इतर व्यक्तींच्या नावावर आहेत. त्या चोरी केलेल्या नाहीत. मात्र, या दुचाकींना चोरी केलेले अत्याधुनिक पार्ट बसवलेले आहेत. पटेल आणि पठाण यांच्या गॅरेजमध्ये हे ‘हेराफेरी’चे काम होत असे. दरम्यान, एमएच १९ एव्ही ६०९, एमएच १० एफ ५९९० आणि एमएच १९ बीटी १७१ या चोरीच्या दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.