आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाच प्रकरणात दोन वर्षे कारावास, नंदुरबार जिल्हा न्यायालयाचा निकाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नंदुरबार - तळोदा येथील वर्ग-३चे सहकार अधिकारी गोकुळ प्रल्हादसिंग गिरासे यास दोन वर्षे सक्तमजुरी सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा सत्र न्यायाधीश आर. बी. बोटे यांनी सोमवारी निकाल दिला.

श्री शांतीधन नागरी पतसंस्थेमार्फत सभासदांना भेटवस्तू वाटप करू देण्यासाठी सहायक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी वरिष्ठ लिपिक वर्ग-३चे गोकुळ गिरासे याने पाच हजारांची लाच मागितली होती. संबंधित अधिकाऱ्यास सन २०१२मध्ये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात येऊन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती. याप्रकरणी शहादा न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यात आले. जिल्हा सत्र न्यायाधीश आर. बी. बोटे यांनी आरोपी गोकुळ गिरासे यास दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. तसेच सहा हजारांचा दंड ठोठावला आहे. सहायक सरकारी वकील अॅड. जसराज संचेती अॅड. सुवर्णसिंग गिरासे यांनी सरकारी पक्षातर्फे काम पाहिले.
बातम्या आणखी आहेत...